कल्याण , कुणाल म्हात्रे : स्वराज्य प्रतिष्ठान हिंदुस्तान महाराष्ट्र राज्य संचलित, आळंदी ते किल्ले श्री रायगड पालखी सोहळा समिती, सांगली जिल्हा समितीच्या वतीने शिवशंभु ऐतिहासिक लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने परीक्षा नुकतीच संपन्न झाली.
आटपाडी, खानापूर, कडेगाव, विटा, सांगोला, माण तालुक्यातून लहान गट - ४१ विद्यार्थी व मोठा गट - ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभारी प्राचार्य. डॉ. विजय लोंढे, प्रा. सदाशिव मोरे इतिहास विभाग प्रमुख, बालाजी बाड आटपाडी तालुका प्रमुख यांचे उपस्थित संपन्न झाला. या परीक्षेसाठी पुनम मोरे, दिव्या पाटणकर, श्रेया पाटणकर, अक्षता जाधव यांचे सहकार्य लाभले.
0 Comments