फी वाढीबाबत कल्याण मधील बिर्ला शाळेबाहेर पालकांचं आंदोलन


■शाळा प्रशासनाचा व्यक्त केला निषेध तर फी वाढ कायदेशीरच; बिर्ला शाळा प्रशासनाचं स्पष्टी करण...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पश्चिमेतील बिर्ला शाळेबाहेर सोमवारी पालकांनी फी वाढी विरोधात काळ्या फिती बांधून आंदोलन केले. बिर्ला शाळा प्रशासनाने यंदाच्या वर्षी २० टक्के वाढ केली आहे, ही फी वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप पालकांनी करत शाळेबाहेरच ठिय्या आंदोलन करत शाळा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. शाळेने फी वाढ मागे घ्यावी अशी मागणी केली. 


         या आंदोलनानंतर शाळा प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या पालकांना चर्चेसाठी बोलावलं या चर्चेत शाळा प्रशासनाने ही फी वाढ मागे घेण्यास नकार दिल्याची माहिती पालकांनी दिली. त्यामुळे यापुढेही शाळे विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगत शाळेच्या या निर्णया विरोधात शिक्षण मंत्र्यांसह न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा पालकांनी दिला.   



         तर याबाबत  शाळा प्रशासनाने कोरोना काळात २०१९ पासून आम्ही कोणतीही फी वाढ केली नव्हती. यंदा नियमानुसार फी वाढ केली आहे. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना फी मध्ये सवलत देण्यात आली आहे. तसेच चार ते सहा टप्प्यात फी भरण्याची मुभा दिली आहे. फी वाढी संदर्भात न्यायालयात प्रकरण असून न्यायालयाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असल्याची माहिती  शाळा व्यवस्थापनाकडून सुबोध दवे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments