ब्रह्मांड कट्टयावर बाल दिना निमित्त बालक पालक संगीत कट्टा दणक्यात साजरा


ठाणे , प्रतिनिधी  : सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर ब्रह्मांड कट्टा ज्येष्ठ व युवांमध्येच नाही तर बालगोपाळांमध्येही तेवढाच लोकप्रिय आहे. म्हणुनच बालदिनाची आगळीवेगळी भेट म्हणुन ब्रह्मांड कट्टा अंतर्गत ब्रह्मांड संगीत कट्टयाने १४ नोव्हेंबर रोजी बालक पालक संगीत कट्टयाचे आयोजन केले होते. यामध्ये लहान मुलांनी स्वत: तसेच पालकांबरोबर द्वंद्वगीते गाऊन धमाल केली.


           या कार्यक्रमात बुद्धी व सौंदर्य ह्यांचा मिलाप असलेली टि. एस्. ए. पनाश मिसेस आशिया ऋजुता देशपांडे यांचा टॉप ऑफ द वर्ल्ड या युरोपच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत 'मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड  २०२१ सेकंड रनर अप' हा दैदिप्यमान किताब मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ऋजुताने सर्व मुलांना त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी असे सुंदर मार्गदर्शनपर भाष्य करुन सर्वांना प्रभावित केले. 'शानसे' कार्यक्रमाच्या निर्मात्या शर्मिला केसरकर व गणेश मांजरेकर यांचाही सत्कार सोहळा झाला. 


          बालकलाकारांनी एकापेक्षा एक विविध प्रकारची गाणी सादर करुन कालच्या बालक पालक कट्ट्यामधे गहिरे रंग भरले. स्वरा दाभाडे हिने 'अधिर मन झाले' , रुपाली परब हिने 'कैसी पहेली है', लता वाघमारे हिने 'दिलबर दिलबर' हे गाऊन वातावरण सूरमयी करुन टाकले. मनिषा ठाणेकर हिने 'बच्चे मन के सच्चे',  आभा बोपलकर व अर्णव बोपलकर यांनी 'आओ तुम्हे चाँदपे ले जाये',  शनाया शर्मा हिने 'लकडीकी काठी' , प्राजक्ता चव्हाण हिने 'आई तू मायेचा सागर', स्वरांगी दळवी हिने 'नाच रे मोरा' , आर्या सावंत हिने 'आवारा भवरे' ही गीते गाऊन वातावरण भारावून टाकले. 


        तेजस पवार याने 'छुकर मेरे मनको', अथर्व महाडीक याने 'निले निले अंबर पे',  विवान देशपांडे याने 'मेरे रश्के कमर' हे गीत गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यानंतर बालक पालक जोड्यांनी अप्रतिम गीते गाऊन कार्यक्रमात रंग भरला. राजू दाभाडे आणि स्वरा दाभाडे यांनी 'चुरा लिया है तुमने', वैशाली पवार व तेजस पवार यांनी 'मला वेड लागले प्रेमाचे', स्मिता सावंत व स्वरांगी दळवी यांनी 'गोरी गोरी पान', मनिषा ठाणेकर व तनया ठाणेकर यांनी 'बडी मुश्किल बाबा' अशी एकापेक्षा एक द्वंद्व गीते गाऊन रसिकांना डोलायला भाग पाडले. 


        ऋजुता देशपांडे व विवान देशपांडेने 'देवा श्रीगणेशा' हे गीत गाऊन वातावरण भक्तीमय करत रसिकांची दाद मिळवली तर कीशोर चव्हाण व प्राजक्ता चव्हाण ह्यांनी 'दिल तो पागल है' गाणे प्रभावीपणे सादर करुन माहौल प्रेममय करुन टाकला. जगदेव वाघमारे व लता वाघमारे यांनी 'अच्छा तो हम चलते है' हे गाणे , शितल,  आभा व अर्णव बोपलकर यांनी ' तेरे बिना जिंदगी से' हे गीत आणि निलेश व अथर्व महाडीकने 'ये राता लंबियाँ लंबियाँ' हे गाणं सुंदररित्या सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.  


        'तुमको पिया दिल दिया' हे गीत मंगला परब व रुपाली परब यांनी आणि कविता शर्मा व शनाया शर्मा ने 'चक दूम दूम' हे गीत दिमाखात सादर केले. ब्रह्मांड कट्टयाची बालदिनाची ही संगीतमय भेट स्पृहणीय ठरली.

Post a Comment

0 Comments