कला शिक्षक शेखर पाटील यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान


 

                                   
डोंबिवली ( शंकर जाधव )  शनिवारी भाजपाच्या शिक्षक आघाडी कोकण विभाग आयोजित वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार गुणगौरव सोहळा ठाण्यात उत्साहात संपन्न झाला. डोंबिवलीच्या शेठ केबी वीरा हायस्कूलचे चित्रकला शिक्षक शेखर पाटील हे विद्यार्थ्यांचा कलात्मक सर्वांगीण सर्वकष विकास व्हावा व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी नेहमीच ते विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. तसेच चित्रकलेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर जनजागृती करून सामाजिक संदेश देत असतात. 


            त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, स्वागताध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, विशेष अतिथी संजय केळकर, आमदार शेषराव बडे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह सहसंयोजक भाजपाच्या शिक्षक आघाडीतील मान्यवरांच्या उपस्थितीत शेखर पाटील यांना वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments