डोंबिवलीतील एम.आय.डी.सी. परिसर होणार कचरा मुक्त केडीएमसी, एमआयडीसी आणि कामा संघटनेची बैठक संपन्न


कल्याण , प्रतिनिधी :  डोंबिवलीतील एम.आय.डी.सी. परिसर  कचरा मुक्त होणार असून त्याअनुषंगाने  केडीएमसी, एमआयडीसी आणि कामा संघटनेची बैठक संपन्न झाली.



 कल्याण डोंबिवली महापालिकेत शिळफाटा मार्गे येताना एम.आय.डी.सी. परिसरात सर्वत्र कचरा पडलेला दिसतो. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. 



त्यानुसार डोंबिवली  एम.आय.डी.सी. परिसर कचरामुक्त करण्याच्या अनुषंगाने आज कामा संघटनेच्या कार्यालयात कामाचे देवेन सोनी,  एम.आय.डी.सी.चे उप अभियंता पतंगेमहापालिका घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, "ई" प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवारमहापालिका सीएसआय नरेंद्र धोत्रेएस आय अनिकेत धोत्रे यांच्या उपस्थितीत  घनकचरा व्यवस्थानाबाबत बैठक संपन्न झाली.



या बैठकीत एमआयडीसी क्षेत्रात पडणारा डोमेस्टिक वेस्टफेज१ व फेज२ मधील कंपन्यातील  ड्राय वेस्ट व झाडांचा पालापाचोळा यांचे संकलना व विल्हेवाट लावण्यासाठी खाजगी संस्था नेमणे. रस्त्यावर पडणा-या /कचरा टाकणा-या नागरिकांविरूध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याकरीता  संयुक्तिक भरारी पथक नेमणे. कचरा निर्माण करणारे आठवडे बाजार बंद करणे इत्यादी बाबींवर महत्वपूर्ण चर्चा घडून आली.



एमआयडीसी भागातील इंडस्ट्री मधील प्लास्टिककागद इ. सुका कचरा महानगरपालिकेने  नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत उचलण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आलीजेणेकरून महापालिकेवरील ताण कमी होईल. दर १५ दिवसांनी  संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येईलअसाही  निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments