कल्याण , प्रतिनिधी : हिवाळा ऋतू जवळ येत आहे. त्यात गरजु व वंचित मुलांना थंडीचा सामना करण्यासाठी नवी-मुंबई मधील होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने “ब्लँकेट्स वाटप” उपक्रम हाती घेतला. आहे. यावेळी पनवेल, नवी मुंबई नजीकच्या रस्त्याच्या कडेला व फुटपाथ वरील १०० गरजवंताना ब्लँकेट्सचे वाटप करून मायेची ऊब दिली आहे. स्वेटर वितरणानंतर त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
अनेक वंचित नागरिक कोणत्याही उष्णतेशिवाय फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला आसरा शोधत असतात व त्या ठिकाणी झोपतात. म्हणून त्यांची दखल घेऊन होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने “ब्लँकेट्स वाटप” करण्यात आले. तर दिवाळीपूर्वी होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमने नवी मुंबईतील विविध भागात १५० गरजू व गरीब मुलांना स्वेटरचे वाटप केले आहे.
आपण घरी असताना थंडीचा सामना करू शकतो परंतू जे फुटपाथ वर राहतात त्यांना खऱ्या अर्थांने मायेची ऊब दिली पाहिजे असे होपमिरर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रमजान शेख यांनी सांगितले.
0 Comments