दिपोत्सवाच्या निमित्ताने डोंबिवलीकरांची शिव शाहीरांना अनोखी आदरांजली
डोंबिवली ( शंकर जाधव ) पाडव्याच्या शुभदिनी भव्य स्वागतयात्रा सुरू करण्याचा मान मिळवलेल्या डोंबिवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराच्या भव्य गाभाऱ्यात गणेश मंदिर संस्थानातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुहूर्तावर शुक्रवारी  सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.उत्सवाच्या निमित्ताने गणेश मंदिर संस्थानाच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट तसेच इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 'खाद्यतेलाचे दान' मोहीमेअंतर्गत स्वीकारलेले खाद्यतेल संबंधित संस्थांना गोरगरीब जनतेच्या वाटपासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.


            शिवप्रेमी,अभ्यासक, संशोधक,अग्रणी शिवशाहीर  कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असल्याने जसा २००५ सालच्या दीपावलीत डोंबिवलीत जशी 'शिवराज्याभिषेकाची महारांगोळी' रेखून शिवबाला कुर्निसातच केला गेला होता तसाच मुजरा  सोळा वर्षांनी याच शिवभक्ताची स्मृति ग्रामदैवताच्या चरणी सुप्रसिद्ध कलाकार उमेश पांचाळ यांच्या कलारेखाटनाद्वारे रांगोळी प्रत्यक्षात साकार करण्यात आली.गणेश मंदिराच्या शेकडो प्रज्वलित दीपांनी उजळलेल्या या गाभाऱ्याचे शेकडो नागरिकांनी  दर्शन घेतले. 


           गणेश मंदिर संस्थानचे विश्वस्त तथाअध्यक्ष राहुल  दामले,रोटरीचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील,इनरव्हील अध्यक्षा राजसी मोहिते,प्रकल्प प्रमुख मनीषा शिंदे,गंधाली निगुडकर,सचिव शैलेश गुप्ते,ज्योती दाते इत्यादींच्या सहकार्य आणि प्रयत्नांनी हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.  रोटरीच्या ३१४२ विभागाचे प्रांतपालांच्या  पत्नी अंजली वारके  या मंगलप्रसंगी आवर्जून उपस्थित होत्या.


          शिवशाहीर कै.पुरंदरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तिका या प्रसंगी मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आल्या.अनेक रोटेरियन्स आणि नागरिकांनी, या तीन संस्थांच्या संयुक्त उपक्रमात जास्तीत जास्त तेलदान केल्यामुळे प्रस्तुत सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. दिव्यासोबतच्या रांगोळी चित्रामुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यस्मृतीला ही उचित अशी मानवंदना ठरली.

Post a Comment

0 Comments