विविध मागण्यांसाठी आजाद मैदान येथे रिक्षाचालक मालकांचे धरणे आंदोलन सुरूकल्याण , कुणाल म्हात्रे  : रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागाच्या अंतर्गत स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून रिक्षाचालक मालकांना सामाजिक सुरक्षा, म्हातारपणी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण रिक्षा खरेदीसाठी कर्ज मिळावे, नवीन मुक्त परवाना बंद करण्यात यावा, यासह रिक्षाचालक मालकांचा विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने मुंबई येथे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.


पोलिसांनी  कोविडमुळे आंदोलनाची परवानगी नाकारली होती परंतु फक्त पाच कार्यकर्त्यांना बसण्यास परवानगी दिल्यामुळे नियमानुसार फक्त पाच कार्यकर्ते आझाद मैदान येथे आंदोलन मध्ये बसले आहेत. महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस, ठाणे मुंबई कल्याण डोंबिवली पनवेल विभागाचे प्रभारी शिवाजी गोरेमुंबई प्रदेश संघटक अक्षय साळवेअंबरनाथ शहरअध्यक्ष मोहम्मद जामखंडीकर रोहन धनावडे प्रफुल खरात आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती शिवाजी गोरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments