सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कामगार सेनेचा निषेध


कल्याण, कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बांधकाम पथकाने बुधवारी मोहने परिसरात बांधकाम सुरु असलेल्या मंदिराच्या चौथऱ्यावर कारवाई केल्याने माजी नगरसेवक मुकुंद कोट यांनी अ प्रभाग सहाय्य आयुक्त राजेश सावंत यांना मारहाण केल्याची घटना घडली. 


        या घटनेचा आज कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कामगार सेने तर्फे पालिकेच्या मुख्यालयात काळी फित लावून निषेध करण्यात आला. दरम्यानया प्रकरणी राजेश सावंत यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिसांनी मुकुंद कोटसह अन्य सात ते आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments