उल्हासनदी पात्रात रंगीत तवंग पसरल्याने जल प्रदूषणात भर भिसोळ बांधरा ते मोहने बांधरा पात्रात पसरले तवंग


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : उल्हासनदी पात्रात भिसोळ बाधंरा ते मोहने बांधरा परिसरात उल्हासनदी पात्रात रंगीत तवंग पसरल्याचे सोमवारी सकाळ पासून दिसत असल्याने केमिकल सोडल्याचा प्रकार तर नसावा या दुष्टीकोनातुन उल्हासनदी बचाव समितीचे सदस्य म्हारळ येथील रहिवासी रवींद्र लिंगायत यांनी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ कल्याण विभाग यांच्याकडे संदर्भीत बाबीमुळे उल्हासनदीचे प्रादुषण होत असल्याबाबत तक्रार केली आहे.  


          मोहेली उदंचन केंद्र ते मोहने बांधरा परिसरातुन कल्याण डोंबिवली मनपा,  स्टेम्, महाराष्ट्र जीवनप्राधिकरण, एम.आय.डी.सी आदि उल्हासनदी पात्रातुन पाणी उचलुन पाणी पुरवठा करतात. त्यामुळे येथील पाण्यात तेलाचा तवंग पसरल्याने नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होण्याचा धोका निर्माण झाला आहे.


        या तक्रारीची दखल महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या आधिकारी वर्गाने घेत, उल्हासनदी पत्रातील रायते पुल परिसरातील  तसेच भिसोळ बांधरा परिसरातील उल्हासनदी पाण्याचे नुमने तापसणीसाठी घेत तपासणी साठी लँब मध्ये पाठविले.  लँब मधुन तपासणी अंती घेतलेल्या पाण्याचा अवहाल आल्यानंतर पाढरंट तेलसदृश्य  तवंग कसला आहे हे समजण्यास मदत होईल असे प्रदूषण महामंडळाचे कल्याण विभाग अधिकारी किशोर केरलेकर यांनी सांगितले.


        रायते पुलाखालील भागात सांडपाणी नदी पात्रात येत  असल्याच्या शक्यतेने काही परिसरात शैवालांची हिरवळ जमा होत असल्याने जलपर्णीची संभाव्य शक्यता आहे. तसेच पाण्यात आढळलेले पाढरंट तेल सुद्श्य   तवंग हे टरबाईनचे असावे, बरेच दिवस साठविलेल्या पाण्यात दुषित पणा असवा अशी शक्यता असुन उल्हासनदी पात्राता नजीक असलेल्या रिसॉर्ट मधील स्विमिंग पुलमधील बरेच दिवासाचे पाणी थेट नदीपात्रात सोडले असण्याची शक्यता असावी त्यामुळे हे पाढरंट तेल सुद्श्य तवंग आले असावेत असा अंदाज प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments