अगांरकी चतुर्थी निमित्ताने टिटवाळा महागणपती दर्शनासाठी गणेश भक्तांची मांदियाळी

                              


कल्याण,  कुणाल म्हात्रे   :  कोरोना पार्श्वभूमी नंतर मंदिरे उघडी झाल्यानंतर मंगळवारी आलेल्या अगांरकी चतुर्थीचा योग पाहता रात्री पासुनच टिटवाळा महागणपती मंदिर परिसरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी रागं लावली होती.    मंगळवारी पहाटे ४वा. सुमारास अगांरकी चतुर्थी निमित्त  टिटवाळा महागणपती मंदिर  भाविकांसाठी खुले करण्यात आले. 


       पहाटे श्री गणेश पूजन करून गणेश भक्तांना दर्शन रांगेतून मंदिरात प्रवेश देणे सुरुवात करण्यात आली. अगदी पहाटेपासूनच कोरोना काळाच्या नंतर मंदिरे उघडण्यास शिथिलता दिल्याने पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे मंदिर श्री गणेश दर्शनासाठी खुले केल्यामुळे मुंबई उपनगर तसेच आजूबाजूच्या परिसरांमधून अनेक भाविकांनी आपल्या परिवारासह श्री गणेश दर्शन घेतले. 


        दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी जवळ-जवळ दोन ते तीन तास उभे राहत गणरायाला साकडे घालत गणेश भक्तांनी महागणपतीचे दर्शन घेतले. गणेश दर्शनासाठी गणेश भक्तांची रात्री चंद्र उदोय होई पर्यंत मांदियाळी झाली होती.  


        टिटवाळा महागणपती मंदिर विश्वस्त कमिटीचे सुभाष जोशी यांच्यशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंदिर व्यवस्थापाने गणेश भक्तांच्या दर्शनासाठी योग्य त्या उपाययोजना करीत  भाविकांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून मंदिर परिसरात कोणतीही वाहने प्रवेश करणार नाही याची खबरदारी घेत सर्व बाजूंनी रस्ते बंदिस्त केले होते. 


        दिवस भरात सुमारे ५० हजार भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. टिटवाळा  पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी वाहतूक कोंडी न होण्यासाठी चोख बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, होमगार्ड अशी ४० कर्मचारी तैनात ठेवले होते.

Post a Comment

0 Comments