युनियन बँक ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वॉकेथॉन
ठाणे, 1 नोव्हेंबर , प्रतिनिधी  :  भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकांमध्ये दक्षता जनजागृती करण्याच्या उद्देशाने युनियन बँक ऑफ इंडिया प्रादेशिक कार्यालय मुंबई -ठाणे आणि प्रादेशिक कार्यालय मुंबई - वाशी यांच्यातर्फे ३१ ऑक्टोबर रोजी दक्षता जागरूकता सप्ताह २०२१ अंतर्गत राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ठाणे येथे `विजी - वॉक फॉर यू अँड मी' या वॉकेथॉनचे संयुक्तपणे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाचे मुख्य दक्षता अधिकारी उमेशकुमार सिंग यांनी 5 कि.मी. लांब विझी-वॉक वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला.


           ठाण्यात हिरानंदानी मेडोजजवळ सकाळी ७ वाजता दक्षतेची आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन विजी वॉकला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एफजीएम  मुंबई राजीव मिश्रा, नगरसेविका जयश्री डेव्हिड, सीजीएम आणि सीसीओ मध्यवर्ती कार्यालय ए. के. विनोद, विभागीय प्रमुख मुंबई-ठाणे रेणू नायर, प्रादेशिक प्रमुख मुंबई वाशी गोविंद झा, प्रादेशिक प्रमुख मुंबई दक्षिण अरुण कुमार, डीजीएम दक्षता विभाग संजय सहाय, झेडव्हीसी मुंबई मुकेश कुमार, उप मंडळ प्रमुख डी. राजशेखर आणि इतर उच्च अधिकारी मध्यवर्ती कार्यालय आणि मुंबई झोन आणि क्षेत्रीय कार्यालय मुंबई या वॉकेथॉनमध्ये ठाणे आणि मुंबई वाशी येथील शाखाप्रमुख आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments