ओले रिजनरिस्ट कोलजेन पेप्टाइज २४; ‘तुमच्या त्वचेसाठी नवीन पोषण’ .

■संपूर्ण दिवस गोंडस, टवटवीत आणि निरोगी त्वचेचा वायदा! आता मिळवा गोंडस आणि टवटवीत त्वचा दिवसभर...

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२१ : केवळ सकाळीच नव्हे, तर दिवसभर ताजीतवानी दिसण्याचा हक्क तुमच्या त्वचेला आहे. ओले इंडिया या देशातील क्रांतीकारी स्किनकेअर ब्रॅण्डने म्हणून आपली नवीन कायापालट घडवून आणणारी श्रेणी ओले रिजनरिस्ट कोलजेन पेप्टाइड २४ बाजारात आणली आहे.

  

         तुमच्या ‘त्वचेसाठी सर्वोत्तम पोषण’ ठरण्याचा वायदा ही उत्पादने करत आहेत आणि तुम्हाला हवी तशी गोंडस, टवटवीत व निरोगी त्वचा दिवसभर मिळवून देण्यात मदतही करणार आहेत! मॉश्चुरायजर आणि सीरमची ही नवीनतम श्रेणी “कोलजेन पेप्टाइड”वर आधारित आहे. हा घटक तुमच्या त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी त्वचेत खोलवर जातो आणि ती गोंडस व टवटवीत दिसत राहावी यासाठी आर्द्रता कायम राखतो. यामुळे संपूर्ण दिवसभर त्वचा उत्तम राखण्यासाठी हा परिपूर्ण स्किनकेअर घटक आहे. 


           नवीन युगातील तंत्रज्ञानांचा मेळ साधून तयार केलेले ओले रिजनरिस्ट कोलजेन पेप्टाइड २४ कोलजेनच्या निर्मितीला उत्तेजन देते. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या कोलजेनप्रमाणेच हे उत्पादन काम करते आणि बायो-अव्हलेबल तंत्रज्ञानाच्या मदतीने, कोलजेनच्या तुलनेत खूपच छोट्या अमिनो आम्ल साखळ्यांच्या माध्यमातून, त्वचेत खोलवर शिरते. गुणवत्ता सिद्ध केलेल्या अस्सल घटकांच्या मिश्रणाने तयार केलेले हे नवीन मॉश्चुरायजर तुमच्या त्वचेचा कायापालट घडवून आणले, कारण यामध्ये खालील घटक आहेत:


त्वचा घट्ट ठेवण्यात मदत करणारे कोलजेन पेप्टाइड (Pal-KTTKS) 


       नायसिनामाइड (व्हिटॅमिन बी३) त्वचेला आर्द्रता धरून ठेवण्यात मदत करते, त्यामुळे त्वचा गुबगुबीत दिसत राहते. त्वचेची चमक हिरावून घेणाऱ्या दैनंदिन ताणांचा प्रतिरोध करण्यासाठी त्वचेला याची मदत होते. त्याचप्रमाणे त्वचेच्या पृष्ठभागावरील पेशींचे पुनरुज्जीवन करून त्वचा निरोगी व आर्द्र राखण्यासाठी उपयुक्त ठरते. 


ग्लिसरिन त्वचेला आकर्षक करते आणि त्यातील आर्द्रता कायम राखते, जेणेकरून त्वचा दिवसभर तजेलदार व तुकतुकीत दिसत राहावी.


          कंपनीच्या स्किन अँड पर्सनल केअर इंडियाच्या उपाध्यक्ष रोहिनी वेंकटेश्वरन, ओले रिजनरिस्ट कोलजेन पेप्टाइड २४च्या अलीकडेच झालेल्या लाँचबद्दल म्हणाल्या, “आधुनिक काळातील स्त्रियांना त्यांच्या उत्क्रांत जीवनशैली निवडींसाठी उपयुक्त ठरू शकतील, अशी उत्पादने तंत्रज्ञान व स्किनकेअर घटकांच्या मिश्रणातून तयार करण्यासाठी आम्ही ओले इंडियाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील असतो. स्किनकेअरचे विपुल ट्रेण्ड्स असल्यामुळे आमच्या असे लक्षात आले की, खरी निरोगी त्वचा कोणती हे ठरवण्याचा अंतिम निकष किंवा चाचणी म्हणजे दिवसभर त्वचा गुबगुबीत आणि टवटवीत राहिली पाहिजे. 


         ओले कोलजेन पेप्टाइड २४ क्रीम आणि सीरम या दोहोंची किंमत प्रत्येक १९९९ रुपये एवढी आहे. ही उत्पादने सर्व आघाडीच्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर तसेच प्रमुख ऑफलाइन स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत. 

Post a Comment

0 Comments