भिवंडीत एसटी बस चालक व वाहक यांच्या संप आंदोलनास मनसेचा जाहीर पाठिंबा..
भिवंडी दि.11 (प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील एसटी महामंडळातील कर्मचारी तुटपुंजे वेतन त्यासोबतच एसटी महामंडळाचा शासनामध्ये विलीनीकरण करावा या मागणी करताच संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी चालक वाहक हे मागील कित्येक दिवसांपासून बेमुदत संप आंदोलन करीत आहे उच्च न्यायालयाने एसटी कर्मचारी यांना संप करण्यास बंदी घातली असतानाही एसटी तकर्मचारी आपल्या मागण्यांवर व आंदोलनावर ठाम आहेत. 

  

           एसटी महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयांतर्गत सर्व एसटी डेपो मधील वाहतूक ठप्प पडली असून, भिवंडी एसटी आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष   डी के म्हात्रे  यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष  बालाजी गुळवी यांच्या नेतृत्वाखाली  भिवंडी शहरातील एसटी डेपो मधील कर्मचाऱ्यांनी छेडलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.


          पाठिंबा देण्यासाठी मनसेचे जिल्हा संघटक मदन पाटील विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अफसर भाई शेख, मनसेचे शहराध्यक्ष मनोज गुळवी, शहर उपाध्यक्ष प्रवीण देवकर,स्वयम रोजगार शहर संघटक शैलेंद्र करले, अनिकेत जाधव अजय भानुशाली सुनील नाईक  विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष योगेश धुळे, दत्ता ताळे यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते,एसटी महामंडळाची बस वाहतूक बंद असल्याने भिवंडी एसटी डेपो आगारातील दैनंदिन 550 फेऱ्या रद्द करण्यात आल्या असल्याने भिवंडी एसटी आगाराचे दैनंदिन 7 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान होत आहे.  

Post a Comment

0 Comments