मिलिंद पाटील राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : महात्मा फुले साहित्य नगरीतृप्ती मंगल कार्यालय म्हसवड जिल्हा सातारा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेले मराठी साहित्य मंडळ आयोजित तिसरे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार आणि साहित्य भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. 


         यावेळी शैक्षणिकसामाजिकराष्ट्रीय कार्यातील भरीव योगदानाबद्दलसामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी समाज परिवर्तन या क्षेत्रामध्ये आदर्श सेवा बजावत असलेले कल्याण मधील मिलिंद पाटील यांना  तिसरे राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनाचे उद्घाटक राजरत्न आंबेडकर आणि संमेलनाध्यक्ष सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


       मिलिंद पाटील यांचे कार्य हे व्यसनांना आळा घालणे तसेच व्यसनाविरोधात प्रचारप्रसारप्रबोधनव्यक्तीचे मतपरिवर्तन करून त्यांना निर्व्यसनी बनविण्यासाठी युवकांपुढे तसेच समाजापुढे  व्यसनमुक्तीचा संदेश जावा यासाठी पथनाट्य स्पर्धारॅली अशा प्रकारे विविध कार्यक्रमांतून संदेश देत कार्य करीत असतात. 


       या कार्यासाठी मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात सरकार मान्य संस्थेच्या वतीने तिसरे  राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संमेलनात मिलिंद रूपचंद पाटील यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२१  देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थीपालक मित्रपरिवार सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. 


     यावेळी स्वागतध्यक्ष ॲड.गौतम सरतापेप्रमुख पाहुणे माजी न्यायाधीशजेष्ठ विचारवंत रावसाहेब झोडगेज्येष्ठ साहित्यीक डॉ. जयप्रकाश धुमटकर  मराठी साहित्य मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments