डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा, संविधानामुळे सामान्यातल्या सामान्य नागरिकांना अधिकार....पंचायत राज मंत्री कपिल पाटील


भिवंडी, प्रतिनिधी  :  माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी माणसाला मुलाच्या हातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण होत आहे ही बाब केवळ  संविधानामुळे शक्य झाले आहे, संविधानाने सामान्यातल्या सामान्य माणसाला सर्वांना अधिकार प्राप्त करून दिला आहे. सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार घटनेने दिला आहे.


      असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी केले. भिवंडी  महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.


          यावेळी व्यासपीठावर ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार महेश चौगुले, आयुक्त सुधाकर देशमुख, विधान परिषद सदस्य रमेश पाटील, सभागृहनेता विकास निकम, आरपीआय एकतावादी नानासाहेब इंदिसे,  उपमहापौर तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष इमरान वली मोहम्मद खान,  अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, भाजपचे गटनेते हनुमान चौधरी, कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास पाटील, काँग्रेसचे गटनेते हलीम अन्सारी, शिवसेनेचे गटनेते संजय म्हात्रे,पुतळा समिती सदस्य नंदनी महेंद्र गायकवाड, साखराबाई गेणु बगाडे, मनीषा सुनील दांडेकर व सविता कोळेकर व इतर  मान्यवर  नगरसेवक, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 


       पंचायतराज मंत्री कपिल पाटील पुढे म्हणाले की, हा पुतळा आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.आपण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या वाटेवर चाललो तर समाजातील ताण, ताणतणाव कमी होतील, असे पाटील यांनी नमूद केले. केंद्रस्तरावर ज्या काही योजना मंजूर करावयाची आहे त्या  योजना माझ्या प्रयत्नाने मंजूर करून घेईल, शहराचा विकास होणे हे महत्त्वाचे आहे असे त्यांनी नमूद केले. 


       यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,डॉक्टर बाबासाहेबांनी लीहलेल्या घटनेमुळे समाजातील सर्व घटकांना एकत्र आणले. बाबासाहेबांनी दिलेल्या भेटीचा सर्व समाजाला फायदा झाला. बाबासाहेब खऱ्या अर्थाने विश्वरत्न असे देखील नमूद केले जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी महापालिकेचा या पुतळा , एक चांगला उपक्रम त्यांनी पूर्णपणे यशस्वी केला आहे, याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की हे संविधान हे 


      स्वअनुभवातून निर्माण झालेला ग्रंथ आहे. समाजाने शरीरात एकत्र येण्या पेक्षा मनाने एकत्र येणे ही संविधानाची शिकवण आहे.अनादिकाळापासून वंचित समाजावर अन्याय झाला, त्यांना न्याय देण्याचे काम बाबासाहेबांनी  केले. भारतीय सविधानच आपली एकता व एकात्मता सामावलेली आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सभागृह नेते तथा पुतळा समिती कार्याध्यक्ष विकास निकम यांनी प्रास्ताविक केले. त्या प्रास्ताविकात त्यांनी तसं 2013 पासून पुतळा उभारणी करण्याकरता आजपर्यंत घेण्यात आलेले कार्य कसे पूर्ण झाले याचे विस्तृत विवेचन केले. 


        आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले की,हा पुतळा उभारणीला एकूण 46,55,524 खर्च आला आहे. पुतळ्या बद्दलची माहिती दिली हा पुतळा शहरातील मध्यभागी ठिकाणी आहे.शहराच्या विकास योजना यामुळे फरक पडणार आहे.भिवंडी शहर विकासाकडे वाटचाल करीत आहे शहरात विकासाच्या अनेक योजना हाती घेतलेले आहेत त्या पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. या करता सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. 


          यावेळी नानासाहेब इंदीसे  यांचे देखील व भाषण झाले नानासाहेबांनी संविधान लीहताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी, किती मेहनत व कष्ट घेतले आहे ते नमूद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान दिनाचे औचित्य साधून सर्वांनी संविधानाची उद्देशिका सामूहिक वाचन करून संविधानाचे महत्त्व विशद केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, संविधान उद्देशिका प्रतिमा भेट देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments