ब्रह्मांड कट्टयाचा सरत्या दिवाळीला संगीतमय निरोप!
ठाणे , प्रतिनिधी  : भेदुनि तिमिर सारा तेजोमय प्रकाश घेऊनी आली. ब्रम्हांड संगीत कट्ट्यावर " दिप संध्या" बहरली! रविवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक ६.३० वांजता सरत्या दिवाळीचं औचित्य साधत  ब्रम्हांड संगीत कट्ट्यावर " दिप संध्या" हा हिंदी मराठी गीतांचा सुरेख कार्यक्रम संपन्न झाला आणि रसिक प्रेक्षकांची दाद मिळवून गेला.


         कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थापक श्री. राजेश जाधव यानी सर्व आॕनलाईन संगीतप्रेमींचे स्वागत केले. ब्रह्मांड  संगीत  कट्टा कमिटीचे चे सचिव चंद्रशेखर शिंदे, उपाध्यक्ष सौ. शितल बोपलकर, अध्यक्ष श्री. अरुण दळवी यांची औपचारिक ओळख करून दिली आणि सर्व कलाकारांना ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या वतीने पुष्पगुच्छ, सन्मानपत्रे देऊन गौरव करण्यात आला. ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे संस्थापक श्री. राजेश जाधव यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


        ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे लाडके गायक श्री.सावनकुमार सुपे यांनी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्यांना साथ दिली श्री.प्रकाश काणेकर, सौ.तन्वी हुलावले, सौ.मिताली हिंगमिरे, श्री.राज दुसाने आणि स्वतः श्री. सावनकुमार सुपे यांनी गायनाची व  निवेदनाची धुरा सौ. रेणू सक्सेना यांनी अत्यंत यशस्वीरित्या सांभाळली.


          कार्यक्रमाची सुरुवात सावनकुमार यांनी "शिर्डीवाले साईबाबा" या बहारदार गाण्याने केली. त्यानंतर तन्वी यांनी "दीपावली मनायी सुहानी, राज यांनी " पाहिले न मी तुला व सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही, प्रकाश यांनी " कलियोने घुंघट खोले,मिताली यांनी " अरे मनमोहना" ही सोलो गीते उत्तम रित्या सादर केली आणि रसिकांची मने जिंकली. सावनकुमार यांनी "चल चल मेरे संग संग" हे सुंदर गीत अप्रतिम गायले आणि आपण एक परिपक्व गायक असल्याची ग्वाही दिली.  तन्वीने ठसकेबाज लावणी "ढोलकीच्या तालावर" ठसक्यात गायली. 


          या सर्व कलाकारांनी द्वंद्वगीतेही उत्तम सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली, प्रीतीचं झुळझुळ पाणी, मुझे कितना प्यार है तुमसे, चाँद छुपा बादल मे , बेखुदी मे सनम, अश्विनी ये ना, दिल तेरा दिवाना मै चली मै चली है सनम अशी एकापेक्षा एक दमदार द्वंद्वगीते सावनकुमार, प्रकाशजी काणेकर, राज दुसाने, मिताली हिंगमिरे आणि तन्वी हुलावले या कलाकारांनी बहारदारपणे सादर केलीत आणि रसिकांची वाहवा मिळवली.


         या सर्व कलाकारांची व रसिक प्रेक्षकांची उत्तम नाळ श्रीमती रेणू सक्सेना यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीदार हिंदी निवेदनाने बांधून ठेवली. त्यांनी स्वतःही सावनकुमारांबरोबर " गुनगुना रहे है भवेंरे" हे द्वंद्वगीत गाऊन आपण निवेदना बरोबरच  उत्तम प्रकारचे गायक आहोत हे सिद्ध केलं व शैलीदार निवेदनाने या कार्यक्रमास चार चा़ँद लावले. अतिशय उस्फुर्त निवेदन रेणुजी यांनी केले.


         कार्यक्रमाचा शेवट सावनकुमार यांनी " हिरवा निसर्ग हा भवतीने" गाऊन केला. सर्व कलाकारांनी या गाण्यात सहभागी होऊन, नृत्य करून या गाण्याचा आनंद घेतला तसेच कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी या गाण्याला गिटार वाद्यांची साथ देऊन रसिक प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आणि या अतिशय बहारदार कार्यक्रमाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments