बीएसयूपी घरांचा प्रश्न सोडवू ... प्रकल्प अधिकाऱ्यांचे आश्वासन
डोंबिवली ( शंकर जाधव )  शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दत्तनगरमधील बीएसयूपी योजनेंतर्गत गोरगरिबांना घरांच्या वाटपाबाबत होत असलेल्या विलंब विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने आंदोलन मागे घेण्याची एका पत्राद्वारे विनंती केली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी बीएसयूपी घरांचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्याने शहरप्रमुख मोरे यांनी तूर्त आंदोलन स्थगित केले आहे. 


            या संदर्भात शहरप्रमुख मोरे यांनी 3 नोव्हेंबर रोजी एका पत्राद्वारे केडीएमसीशि पत्रव्यवहार केला होता. हे पत्र बीएसयुपी लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांना 12 नोव्हेंबर रोजी प्रपात झाले. विषयाकिंत संदर्भाधीन पत्राचे अनुषंगाने कळविण्यात येते की, जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानातील बीएसयूपी योजनेतंर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील झोपडीधारकांचे महानगरपालिकेच्या संमत्रकामार्फत बायोमेट्रीक व सोशिओइकोनॉमिक सर्व्हेक्षण झालेले आहे.


          दत्तनगर डोंबिवली (पुर्व) येथील सर्वेक्षणानुसार एकूण 668 झोपडीधारकांपैकी 436 झोपडया निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी लाभार्थी निकषानुसार वास्तव्याचे सबळ व स्वतंत्र पुरावे सादर केलेल्या झोपडीधारकांना महानगरपालिका बीएसयुपी लाभार्थी निवड समितीने छाननी व पडताळणी करुन 189 झोपडीधारकांना पात्र ठरवून, त्यांची शिफारस सर्वसाधारण सभेपुढे केली होती. सर्वसाधारण सभेच्या मान्यतेअंती पात्र लाभार्थी निश्चित करुन त्यांना विहीत कार्यपध्दतीनुसार सदनिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत. 


          उर्वरीत 247 झोपडीधारकांनी सादर केलेल्या वास्तव्याच्या पुराव्यांची बीएसयुपी लाभार्थी निवड समितीमार्फत छाननी व पडताळणी केली असता, त्यामध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहे. यासंदर्भात शासन स्तरावर 15 दिवसात बैठक घेवून, या प्रकरणी बैठकीअंती पुढील यथायोग्य कार्यवाही करण्यात येईल. सबब, आपण विषयांकित प्रकरणी 15 नोव्हेंबर लाक्षणिक उपोषणाचा मार्ग अवलंबू नये व प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती सुनिल पवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments