कल्याण , कुणाल म्हात्रे : म्हारळ पाडा येथील सर्वे क्रमांक ७०/४ या जागेवर एका विकासकाने न्यायलच्या आदेशाला बगल देत व शेतकऱ्यांचा विरोध झुगारून अनेक झाडे उद्ध्वस्त केली आहेत. याबाबत शेतकरी बळीराम म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी, वनाविभाग, तहसिलदार व पोलिस अधिक्षक ठाणे यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
कल्याण तालुक्यातील म्हारळ पाडा येथील सर्वे क्रमांक ७०/ ४ या जागेच्या वादाचा दावा न्यायालयात सुरु आहे. त्यासंदर्भातची सुनावणी गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयात सुरू, असून 2021 मध्ये न्यायालयाने विकासक, शेतकरी व कुळ असलेले स्थानिक यांना 10 जानेवारी 2022 परियांत या जागेत कोणतीही प्रकारची हालचाल अथवा काम करण्यास सक्त मनाई हुकूम काढण्यात आलेला आहे. मात्र असे असतानाही विकासकाकडून न्यायालयाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत सर्रासपणे जेसीबी लावून या परिसरातील अनेक झाडे तोडण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी व कुळा सदरी नाव असलेले बळीराम मारुती म्हात्रे व इतर ग्रामस्थांनी या विकासकावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, वनाविभाग, तहसिलदार व पोलिस अधिक्षक ठाणे यांच्याकडे तक्रारी अर्ज केला दाखल आहे. आता प्रशासन या वर नेमकी काय कारवाई करते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments