कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याणात गुरूवारी दुपारी अचनाक पावसाच्या सरी कोसळल्याने अवकाळी आलेल्या पावसाने  फुटपाथवर भाजी व फळे विक्रेत्याच्या मालाचे नुकसान झाले. तर अचनाक आलेल्या पावासाने खरेदीसाठीतसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या वर पावसात भिजण्याची वेळ आली.            

               

       कोरोना रूग्णांची संख्येत घट होत असताना गुरूवारी अवकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसेव्हायरल फिवर आदी आजार बळविण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने नागरिकांनी संभाव्य आजाराबाबत दक्ष राहत वेळीच औषध उपचार करणे गरजेचे असल्याचे मत डाँ. राहुल दुबे यांनी संपर्क साधला असता सांगितले. 


           तर ग्रामीण परिसरात अवकाळी पावसामुळे कापणी केलेले झोडणीच्या प्रतिक्षेत असलेले  भाताचे सुकलेले भारे भिजल्याने काही शेतकऱ्यांच्या हाता तोडीशी आलेल्या घासावर अवकाळी पावसाने पाणी फिरविल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments