'बापरे बाप' गुरुजी वर्गात घुसला साप; विद्यार्थ्यांची भल्या मोठ्या सापाला पाहून आरडा ओरड ...


भिवंडी,दि 12(प्रतिनिधी) विध्यार्थी शिक्षणात गुंग असतानाचत्यांच्या वर्गात भलामोठा साप खिडकीतून वर्गात घुसल्याचे पाहताच विद्यार्थ्यांनी दप्तर सोडून वर्गातून पळ काढत एकच आरडाओरड केल्याची घटना घडली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील लोनाड नजीक चौधरपाडा येथील पंचक्रोशी हायस्कुलमध्ये  घडली आहे. 


 

विध्यार्था वर्गात असतानाच   भलामोठा  साप खिडकीतुन घुसला वर्गात ..           कोरोना काळात राज्यात विध्यार्थासाठी शिक्षणाचे दार बंद होते. त्यामुळे वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेत होते. मात्र ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी उपलब्ध होत नव्हत्या, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. मात्र काही महिन्यापूर्वीच पुन्हा ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या. त्यातच भिवंडी तालुक्यातील चौधरपाडा येथील  हायस्कुलही  सुरु करण्यात आली आहे.         त्यातच आज दुपारच्या सत्रात शाळा सुरु असतानाच भलामोठा  साप खिडकीतुन वर्गात घुसला. या भल्यामोठ्या सापाला पाहून विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण होऊन एकच  गोधंळ उडाला होता. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनाही वर्गात  साप घुसल्याची माहिती  मिळाली होती. त्यातच एका शिक्षक नामदेव लोखंडे,यांनी  सर्पमित्र दत्ता बोबे यांच्याशी संपर्क करून वर्गात साप घुसल्याची माहिती दिली. 


 

वर्गात साप घुसल्याने अर्धा तास वर्ग बंद .. 


      भलामोठा साप वर्गातील खिकडीतच असल्याने कोणाचाही वर्गात जाण्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे अर्धा तास वर्ग बंद करण्यात आला होता. तर दुसरीकडे माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोबे यांनी घटनास्थळी येऊन या भल्यामोठ्या सापाला पकडले. साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून साडे सात फूट लांबीचा आहे. या सापाला वन अधिकाऱ्याच्या परवानगीने लगेच जंगलात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांनी दिली आहे. 


Post a Comment

0 Comments