भिवंडीत पहाटे दोन ठिकाणी आगीच्या घटना..


भिवंडी दि 28 (प्रतिनिधी ) परिसरात एकाच दिवशी दोन ठिकाणी आगीची घटना घडली असून भिवंडी शहरातील माधवनगर धामणकर नाका परिसरात असलेल्या मोदी डाईंग मध्ये पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली आणि एकच खळबळ उडाली .  


         मोदी डाईंग चे बॉयलर मध्ये लिकेज झाल्याने त्यातून ओईल गळती सुरू झाली व अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आगीचे लोड दूरवरून पाहता येत होते अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन या आगीवर  नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.          तर दुसर्‍या घटनेत भिवंडी ग्रामीण परिसरात असलेल्या खोनी ग्रामपंचायत हद्दीमधील मच्छा कंपाऊंड मधील भंगार गोदामाला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली यामध्ये संपूर्ण भंगार गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले होते त्यामुळे भंगार गोदमतील संपूर्ण माल जळून खाक झाल्याची घटना घडली आहे आसपासच्या नागरिकांनी आगीला विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग एवढी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते.


          त्यामुळे नागरिकांनी अग्निशमन दलाला आगीची घटना कळवली व तात्काळ भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व या आगीवर ती तब्बल तीन तासांनी नियंत्रण मिळवले मागील दोन दिवसात आगीची ही चौथी घटना आहे त्यामुळे या आगी लागतात की लावल्या जातात हाच खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.

Post a Comment

0 Comments