बीएसयुपी घरांचे वाटप का नाही ? शिवसेना शहर प्रमुखाचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा




डोंबिवली ( शंकर जाधव ) केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील जेएनएनयूआरएम (बीएसयूपी) प्रकल्पानुसार शहर झोपडपट्टी मुक्त योजना अमंलात आणण्यात आली.कल्याण –डोंबिवली महानगरपालिका हद्दीत हि योजना राबविताना लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळाली नाहीत.लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळत नसल्याने यात नक्की कोण दिरंगाई करतेय असा प्रश्न पडला आहे.घरे तयार असूनहि लाभार्थी घरापासून का का वंचित राहिले असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन बीएसयुपी प्रकल्पातील घरांचा ताबा मिळेपर्यत प्रशासनाविरोधात दत्तनगर चौकात १५ तारखेपासून तीन दिवस लाक्षणिक उपोषणास बसू असा इशारा दिला आहे.

 

         जेएनएनयूआरएम (बीएसयूपी) प्रकल्प सुरु होऊन ११ ते १२ वर्ष उलटली आहे. सुरुवातीला ठेकेदाराने लाभार्थ्यांना घरभाडे दिले.त्यानंतर काही काही महिन्यानंतर ठेकेदाराने घरभाडे देणे बंद केल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.एकीकडे राहते घर राहिले नाही आणि दुसरीकडे प्रकल्पातील घरे तयार असूनही ताबा मिळत नाही अशी अवस्था डोंबिवलीतील लाभार्थ्यांची झाली आहे.याबाबत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी लाभार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायवर आवाज उठवला आहे.


         मोरे यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र देऊन लाक्षणिक उपोषनाचा इशारा दिला आहे.आम्हाला घरे कधी मिळणार ? असा प्रश्न लाभार्थी विचारीत आहेत.डोंबिवलीतील भूषण तिरंगा झेंडा संकल्प तीर्थ दत्तनगर चौक येथे ३ दिवस लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचे पत्रात म्हटले आहेत. दत्तनगर येथील सुमारे २५० लाभार्थी या प्रकल्पातील घरापासून वंचित असून शिवसेनेच्या या प्रयत्नाने घरे मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

Post a Comment

0 Comments