अभिनय कट्ट्यावर शोध कलाकारांचा माध्यमातून डान्स डान्स हा कट्टा संपन्न झालाठाणे, प्रतिनिधी  :  अभिनय कट्ट्यावर नव्याने सुरू झालेल्या शोध कलाकारांचा या उपक्रमाअंतर्गत डान्स डान्स हा कट्टा आयोजित करण्यात आला. नौपाडा विभागातील अन्वीता पाटणकर राधा कैसे ना, शिवम सुळे व देवश्री सुळे आई मला पावसात भिजू दे, पूर्वा तटकरे मोरनी बनके, अपर्णा वाडदेकर केव्हातरी पहाटे, अनंत मुळे  पग घुंगरू बांध, याद आ रहा है, सायली लोहार हिने  लावणी नृत्य, अजिंक्य ताजणे - मुकाबला, राजन मयेकर - गोजिरवाण रूप तुझं, डॉ र म शेजवलकर यांनी कविता सादर केल्या.


           परेश दळवी याने आजपर्यंतचा अभिनय कट्ट्याचा प्रवास शीर्षक गीतावर सादर केला. सई कदमने निवेदन केले. त्याचप्रमाणे प्रत्येक सादरीकरण करणाऱ्या कलाकाराला शोध कलाकारांचा चे प्रमाणपत्र देण्यात आले. पुढील रविवारी १४ नोव्हेंबर रोजी पाचशेवा कट्टा सादर होणार आहे.या विक्रमी कट्ट्याची रूपरेषा दोन दिवसात जाहीर होईल असे किरण नाकती यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments