भाजप आमदार रमेश पाटील यांचं कल्याणात वादग्रस्त विधान ज्यानी विना परवानगी मंदिर तोडलं त्याला तोडण्याची वेळ आलीय,

■दोन दिवसात सगळ्यांनी एकत्र या कल्याण बंद करू  - आमदार रमेश पाटील,भाजपच्या मच्छिमार सेल आणि कोळी महासंघाच्या वतीने मच्छीविक्रेता  परवाना वितरण...


कल्याण , कुणाल  म्हात्रे : ज्यानी विनापरवानगी मंदिर तोडलं त्याला तोडण्याची वेळ आलीय दोन दिवसात सगळ्यांनी एकत्र या कल्याण बंद करू  असे चिथावणीखोर वादग्रस्त वक्तव्य  भाजप आमदार रमेश पाटील यांनी कल्याणमध्ये केलं आहे. आज मच्छीविक्रेता  परवाना वितरण कार्यक्रम भाजपच्या मच्छिमार सेल आणि कोळी महासंघाच्या वतीने कल्याणतील दामोदाचार्य हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.


या कार्यक्रमासाठी मच्छी विक्रेत्यांनी गर्दी गेली होती. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी आम्ही मच्छी विक्रेत्यांच्या पाठीशी उभी असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार पाटील यांनी कल्याण मोहने येथिल मंदिरावर केडीएमसी ने  कारवाई केली यामुळे जो वाद झाला त्याबाबत बोलताना ज्यानी विना परवानगी मंदिर तोडलं त्याला तोडण्याची वेळ आता आलीय, पुढील दोन दिवसात सर्वांनी एकत्र येऊन कल्याण बंद करायचं आहे असं वादग्रस्त विधान केलं. कार्यक्रमानंतर आमदार पाटील यांनी मंदिरावर कारवाई अधिकाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी असून याबाबत पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले.


कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील  मच्छीविक्रेत्यांना केडीएमसीकडून  परवाना वितरण करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा मच्छिमार सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चेतन पाटील आणि आामदार रमेश पाटील यांनी यासाठी एका वर्षापूर्वी केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांन अखेर यश आले असून  कल्याण डोंबिवलीतील जवळपास ७५० हून अधिक  मच्छी विक्रेत्यांना परवाने दिले जाणार आहेत. आज काही विक्रेत्यांना प्रातिनिधीक स्वरुपात परवाने भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि रमेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

Post a Comment

0 Comments