ऑप्टिमस फार्माद्वारे कोविड-१९ वरील औषध 'मोलनुपिरावीर'चे संशोधन पूर्ण


■उपचारांदरम्यान ५ आणि १० दिवसांत उत्कृष्ट परिणामांची नोंद ~


मुंबई, २ नोव्हेंबर २०२१ : ऑप्टिमस समूहाने कोविड-१९ वरील बहुप्रतीक्षित औषध मोलनुपिरावीर ओरल कॅप्सूलच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. सीडीएससीओ, डीजीएचएस, भारतीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाच्या विषयतज्ज्ञ समितीच्या (एसईसी) शिफारशींनंतर १८ मे, २०२१ रोजी ऑप्टिमसला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीजीसीआय) चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली होती.


       ऑप्टिमस फार्माचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. श्रीनिवास रेड्डी म्हणाले की, “स्वदेशातच विकसित फॉर्मूलेशनसह ऑप्टिमस कंपनी भारत सरकारच्या मेक इन इंडिया पुढाकारात आपला विश्वास भरभक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. कोविड-१९ विरुद्ध एक अत्याधुनिक आणि परवडणारा उपचार पर्याय विकसित करणे आणि कमीत कमी कालावधीत या आजाराला निष्क्रिय करणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे. मोलनुपिरावीरच्या पुरवठ्यासाठी आमच्यावर विसंबून असलेल्या जगभराच्या विविध क्षेत्रांतील आमच्या भागीदारांना सहकार्य करण्याबाबत आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.आशाजनक निकालांसह ऑप्टिमसने आपला अंतिम क्लिनिकल ट्रायल अहवाल दाखल केला आहे.”


         “हे निकाल कोविड-19 चा नायनाट करण्याच्या दिशेने एक नवी आशा आहे. इतकेच नव्हे तर निष्पक्ष व वैध परीक्षण सुनिश्चित करणे तसेच तो एका आत्मनिर्भर औषधनिर्मिती उद्योगाला अत्यावश्यक समर्थन देण्यासह केंद्रीय परवाना प्राधिकरणावर आमचा विश्वास आणखी दृढ करतो. या वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीत सीडीएससीओ हे एक आशियातील विश्वासार्ह केंद्रीय परवाना प्राधिकरण म्हणून उदयास आले आहे. जे औषधनिर्मिती उद्योगात नवोन्मेष आणि कठोर नियमन तसेच गुणवत्ता पालनाला चालना देत आहे,” असे ते पुढे म्हणाले.


        केंद्रीय परवाना प्राधिकरणाकडे मोलनुपिरावीरच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचे निकाल दाखल करणारी ही पहिलीच औषधनिर्मिती कंपनी आहे. ऑप्टिमसची वैद्यकीय चाचणी भागीदार जेएसएस रिसर्चला चाचण्यांच्या प्राथमिक पातळीवरील अंमलबजावणीचे काम सोपवण्यात आले होते. भारतभरात २९ अध्ययन स्थळांसह देशाच्या जवळपास ९६% लोकसंख्याशास्त्रीय संसाधनांना यात समाविष्ट करण्यात आले आहे. इतर सामान्य उपचार पर्यायांच्या तुलनेत मोलनुपिरावीरचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे इतकेच नव्हे तर भारतभरातील वैविध्यपूर्ण जनुकीय संग्रहामध्ये या औषधाचा प्रभावीपणा दाखवून देणे, हाही या चाचण्यांमागील हेतू होता.

 

          SARS-CoV-2 संसर्गाच्या सर्वांगीण उपचारांत राष्ट्राच्या अपुऱ्या वैद्यकीय गरजांच्या पूर्ततेसाठी मोलनुपिरावीरचे उत्पादन आणि वितरण सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने करण्यासाठी ऑप्टिमस पूर्णपणे सज्ज झाली आहे.

Post a Comment

0 Comments