शास्त्री नगरमध्ये शासकीय योजनेसाठी नावनोंदणी शिबिर

 


ठाणे (प्रतिनिधी) - शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील समाजाला मिळावा, या उद्देशाने शास्त्री नगर येथे  माजी स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये हजारो नाागरिकांनी विविध योजनांसाठी आपली नावनोंदणी केली. 


        ठाणे शहरातील गरीब, गरजू, नागरिकांना शासनाच्या ई श्रम कार्ड योजना, महात्मा फुले जनआरोग्य कार्ड, हेल्थ कार्ड आदी योजनांसाठी शास्त्री नगर येथे भैय्यासाहेब इंदिसे यांनी आज (दि.22) आणि मंगळवार असे दोन दिवस शिबिर आयोजित केले आहे. आज पहिल्याच दिवशी सुमारे दीड हजार नागरिकांनी या योजनांसाठी नावनोंदणी केली. 


         या संदर्भात भैय्यासाहेब इंदिसे यांनी, पहिल्याच दिवशी या शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मंगळवारीही नागरिकांनी आपल्या नावांची नोंद करुन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments