कलाकारांची पंढरी दुमदुमली , अभिनय कट्ट्याचा ५००वा कट्टा म्हणजे समस्त ठाणेकरां साठीचा अभिमानाचा क्षण


ठाणे, प्रतिनिधी  : अभिनय कट्ट्याचा उल्लेख नेहमीच  ठाण्याचे सांस्कृतिक प्रवेशद्वार असा केला जातो. त्याचं कारण किरण नाकती यांच्या संकल्पनेतून आदित्य प्रतिष्ठान,ठाणे या संस्थेच्या माध्यमातून मागील तेवीस वर्षे सलग कला,क्रीडा व सामाजिक विभगात काम करत असताना अकरा वर्षांपूर्वी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने अभिनय कट्टा सुरू झाला.


        अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती स्वतः अनेक एकांकिका, प्रायोगिक नाटक, मालिका ,चित्रपट यासाठी लिखाण, अभिनय ,दिग्दर्शन करत असताना एक गोष्ट लक्षात आली की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या असंख्य नवोदित कलाकारांना खिशात पैसे नसताना आपली कला सादर करण्याची संधी कुठेच मिळत नाही. 


         मग ते विविध ठिकाणी ऑडिशन देतात आणि निवड झाली नाही म्हणून निराश होऊन बाहेर जातात.या महाराष्टातील प्रत्येक रंगकर्मींना वाव देण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता किरण नाकती यांच्या संकल्पनेतून अभिनय कट्ट्याची सुरूवात २७ फेब्रुवारी २०११ रोजी करण्यात आली. 


         हा संपूर्ण प्रवास आता पाचशे आठवड्यांचा झाला आहे. या पाचशेव्या प्रयोगाचे तसेच बालदिनाचे औचित्य साधून बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले.याचे उद्घाटन ज्येष्ठ नाट्य चित्रपट अभिनेते जयंत सावरकर हस्ते  अभिनव पद्धतीने करण्यात झाले. महाराष्ट्राला संत महात्म्यांचा ,थोर पुरुषांचा मोठा इतिहास आहे.


         याचीच जोड देत बाल शिवाजी ,संत ज्ञानेश्वर ,मुक्ताई, चाचा नेहरू, सावित्रीबाई फुले, बाळूमामा ,अशा थोरांच्या वेशभूषेतील लहान मुलं व त्यांच्या हातातील प्रत्येक बंदिस्त असलेल्या शब्दपाटीचे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करीत ५००वा अभिनय कट्टा बालमहोत्सव अशी एक ओळ तयार झाली व या महोत्सवाचे औपचारिकरित्या उद्घाटन झाले.


           सोबत दिप प्रज्वलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ र म शेजवलकर, शिक्षिका मंजिरी दांडेकर, अभिनेता नीलेश भगवान , संचालक किरण नाकती आदी मान्यवर उपस्थित होते.या निमित्ताने एकूण चार वयोगटासाठी चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,स्मार्ट बेबी ऑनलाईन स्पर्धा या विविध स्पर्धांचे आयोजन किरण नाकती यांनी केले.स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


           तसेच निलेश भगवान याने उपस्थित लहान मुलांना व त्यांच्या पालकांना सुद्धा आपल्या सोबत रात चांदणं या गाण्यावर थिरकायला लावले.सर्वच पालक पुन्हा एकदा त्यांच्या बालपणात रममाण झाले. तसेच कीर्तनकार  दिलीप नामजोशी यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन करत बाल संस्कार


         कीर्तन सादर केले. लेखक व अभिनेता निनाद कदम याने काही वेळ निवेदन तसेच लहानग्यांना काही संस्काराच्या गोष्टी अगदी मजेशीर पद्धतीने सांगत बच्चे कंपनीची मनं जिंकली.सर्वच स्पर्धा सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत आटोपल्या व नंतर एका तासाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा संध्याकाळच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.सायली व उत्कर्षा या नृत्यांगणांनी गणेश वंदना सादर केली.


        अनंत मुळे यांनी आपल्या गायनातून  गणपती बाप्पाला वंदन केले. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बार्डो या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे यांची मुलाखत सुरू झाली.एका सामान्य घरातून आलेल्या भीमराव मुडे यांचा थक्क करणारा प्रवास ऐकून अभिमान वाटला , टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी मुडे यांचे कौतुक केले.

 

         तसेच आभाळमाया, क्राईम डायरी, संभाजी व अशा अनेक मालिकेचे दिग्दर्शक विवेक देशपांडे यांनी सुद्धा उपस्थित बालक व पालक वर्गाला मार्गदर्शन केले.निनाद कदम, सई कदम यांच्या सोबत गंधर्व कला मंच च्या कलाकारांनी आरण्यक या नाटकातील प्रवेश सादर करून प्रेक्षकांना  एक नाटक अनुभवण्याचा वेगळा अनुभव दिला. 


           वकृत्व स्पर्धेतील अमोघ डाके व इतर अनेक बाल वयोगटातील मुलांनी आपले सादरीकरण केले. त्यातील आर्वी चोरगे या साडेतीन वर्षाच्या मुलीने जय भवानी ,जय शिवाजी अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत अफझलखान वधाचे कथाकथन सादर केले. 


         उपस्थित सर्वांनीच उभं राहून टाळ्या वाजवल्या. तसेच अनविता पाटणकर हीचे दमदार नृत्य, अपर्णा वाडदेकर  यांनी बालगीत सादर केलं.तसेच स्वर्गीय संकेत देशपांडे लिखित सर्कशीतील जोकरची व्यथा मांडणाऱ्या  एकपात्रीचे सादरीकरण परेश दळवी यांनी केले व उपस्थित सर्वच प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.टाळ्यांचा गजर झाला.उपस्थित सर्वच अभिनय कट्टा,संगीत कट्टा  कलाकार व वुई आर फॉर युचे सदस्य यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


         हा अभिनय कट्टा म्हणजे समस्त ठाणेकरांची एक चळवळ असून या पाचशेव्या कट्टयापर्यंतचा प्रवास माझं कुटुंब,  समस्त ठाणेकर, सर्वच प्रसार माध्यमं, सर्व लोकप्रतिनिधी, मार्गदर्शक ठाण्याचे पालकमंत्री कनाथ शिंदे , महापौर नरेश म्हस्के, ठाणे महागरपालिका, माजी ज्येष्ठ  नगरसेवक भास्कर पाटील, माझे कट्ट्याचे कलाकार ,नौपाडा विभागातील सर्वच नागरिक या प्रत्येकांमुळेच शक्य झाला. या अभिनय कट्ट्याच्या यशाचे संपूर्ण श्रेय मी या सर्वांना देत आहे. 


          यापुढेही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा अभिनय कट्टा असाच बहरत राहो की स्वामींकडे प्रार्थना.असे आपले मत संचालक किरण नाकती यांनी व्यक्त केले.सकाळी नऊ वाजता सुरू झालेला हा विक्रमी पाचशेवा कट्टा रात्री दहा वाजेपर्यंत एक तासाचा मध्यंतर घेत बारा तास चालला. कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी, निनाद कदम, सई कदम यांनी केले.


           विविध स्पर्धांचे परीक्षक म्हणून डॉ र म शेजवलकर, मंजिरी दांडेकर, शेखर टेमघरे, शुभांगी भालेकर यांनी काम पाहिले.प्रसंगी उपमहापौर पल्लवी कदम, ठाणे उपशहरप्रमुख जगदिश थोरात, माजी नगरसेवक भास्कर पाटील, विभागप्रमुख दिपक म्हस्के, राजेश तावडे,बाळा गवस व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.चित्रकला स्पर्धा 

गट १ ली ते ५वी

प्रथम क्रमांक. रामेश्वरी गायकर,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक. अबीर पवार,,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक. भक्ती आनंद बेलोशे

,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

उत्तेजनार्थ . प्रथम क्रमांक. अजिंक्य ताजणे

द्वितीय क्रमांक. वेदांगी बने

गट ६ वी ते १० वी 

प्रथम क्रमांक . कार्तिक झंझाड 

,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक. अस्मिता धरडे 

,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक. अनुष्का जाधव 

,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.सलोनी बनसोडे

द्वितीय क्रमांक. मैत्रेय दिवाडकर 

३ गट १० वी ते पुढील 

प्रथम क्रमांक. दृष्टी मोर्ये,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक. दर्शना लाड,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक. तन्मय पेडणेकर ,रोख रक्कम, सन्मानचिन्ह

 सन्मान चिन्ह व रोक रक्कम व सर्टिफिकेट


हस्तकला स्पर्धा 

प्रथम क्र.प्रियांका पेडणेकर, प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम व सन्मानचिन्ह

द्वितीय क्र.अर्पित रहाटे प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम व सन्मानचिन्ह

तृतीय क्र. रोशनी निमोले प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम व सन्मानचिन्ह

उत्तेजनार्थ.वैष्णवी चेऊलकर . प्रशस्तीपत्रक

उत्तेजनार्थ. अनविता पाटणकर. प्रशस्तीपत्रक

उत्तेजनार्थ.आकांक्षा तळेकर.प्रशस्तीपत्रक


वकृत्व  स्पर्धा  

अर्पित रहाटे

आयुष राऊत

वैष्णवी चेऊलकर

अमोक डाके

प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह

स्मार्ट बेबी ऑनलाईन स्पर्धा

गट  २ ते ३ वर्ष 

प्रथम क्रमांक.रुजुला चोरघे

द्वितीय क्रमांक. हृतिका भोईर 

तृतीय क्रमांक. विहा वागरे 

उत्तेजनार्थ. प्रथम क्रमांक. पार्थ पटेल 

 द्वितीय क्रमांक. वांक्षिका 

गट ३ ते ४ वर्ष 

प्रथम क्रमांक.इहा आंबेरकर 

द्वितीय क्रमांक. अनैशा प्रसाद 

तृतीय क्रमांक. देवश्री सूळे

उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक. इहा राख 

द्वितीय क्रमांक. शीमुने सोनी 

गट ४ ते ७ 

प्रथम क्रमांक. विनय खामकर 

द्वितीय क्रमांक. अनन्या बराल 

तृतीय क्रमांक. युक्ता अाशिष मगम

उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक. शिवम सुळे

द्वितीय क्रमांक. निया पवार 

सन्मान चिन्ह व रोख रक्कम प्रशस्तीपत्रक


निबंध स्पर्धा

 प्रथम क्रमांक. दीप्ती लांबे

द्वितीय क्रमांक. अक्षदा मळेकर 

तृतीय क्रमांक. वीहा बसुटकर 

उत्तेजनार्थ. हर्ष कदम

रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह

Post a Comment

0 Comments