प्रवाशांचे वाढते अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील संथ गतीने सुरू असलेली कामे तात्काळ पूर्ण करा - महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी

■मध्य रेल्वे डीआरएम शलभ गोयल यांना दिले निवेदन महिलांच्या डब्यात इमर्जन्सी टॉल्क बॅक सिस्टम संघटनेच्या पाठपुराव्याला यश


ठाणे , प्रतिनिधी :  मध्य रेल्वे मार्गावर अजूनही प्रवाशांचे रेल्वे अपघात होत असून रखडलेले पादचारी पुलाच्या कामामुळे प्रवाशांना रूळ ओलांडावा लागत आहे. यामुळे रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करा या करिता सोमवारी दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांची महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे, सल्लागार अमोल कदम यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.


             रेल्वे प्रवाशांचे वाढते अपघात पाहता हे अपघात रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात. तसेच रेल्वे स्थानक वरील रखडलेली कामे तसेच संथ गतीने सुरू असलेली रेल्वे मार्ग, पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्टची कामे तात्काळ पूर्ण करून रेल्वे प्रवाशांच्या अडचणी समजून घेऊन प्रवाशांना उद्भवणाऱ्या समस्या तात्काळ सोडवाव्यात असे निवेदन मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक (डीआरएम) शलभ गोयल याना महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे, सल्लागार अमोल कदम यांच्या वतीने देण्यात आले. 


        तसेच रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या महिला डब्यात कुठलीही अडचण महिलांना उद्भवली तर थेट इमर्जन्सी टॉल्क बॅक सिस्टम द्वारे आरपीएफशी संपर्क साधून मदत मिळवू शकतात अशी मशीन महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या निवेदनाच्या मागणीवरून रेल्वे प्रशासनाने इमर्जन्सी टॉल्क बॅक सिस्टम लावल्याने डीआरएम शलभ गोयल यांचे आभार मानण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे, सल्लागार अमोल कदम उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments