आंदोलन कर्त्या रिक्षा चालकांनी घेतली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट


■प्रश्न न सोडवल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार  महाराष्ट्र रिक्षा पंचायत सरचिटणीस शिवाजी गोरे यांचा इशारा


कल्याण , प्रतिनिधी  : रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरु असून या आंदोलनकर्त्या रिक्षाचालकांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. रिक्षा चालकांचे प्रश्न त्वरित न सोडविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सरचिटणीस शिवाजी गोरे यांनी दिला आहे.


       कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी तामिळनाडूच्या धर्तीवरती रिक्षा चालक मालकांसाठी फसवे कल्याणकारी मंडळाची घोषणा जाहीर केली असून हे कल्याणकारी महामंडळ फसवे असून यातून रिक्षाचालकांचा कोणताही फायदा होणार नाही. 


        उलट रिक्षाचालकांचे भविष्यामध्ये फार मोठे नुकसान होणार आहे याबद्दल महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी मुंबई मंत्रालय चला असा इशारा देत कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचे आदेश दिले होते. यामुळे महाराष्ट्र रिक्षा पंचायत मुंबईठाणेकल्याण-डोंबिवलीपदाधिकाऱ्यांनी मुंबई आजाद मैदान येथे तीव्र आंदोलन करूनमहाराष्ट्राचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.


महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस ठाणे मुंबई रायगड जिल्ह्याचे प्रभारी शिवाजी गोरे यांच्या नेतृत्वाखालीअंबरनाथ शहरअध्यक्ष मोहम्मद जामखंडी, मुंबई प्रदेश संघटक अक्षय साळवे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालयामध्ये हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत रिक्षाचालक मालक यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली.


 तातडीने रिक्षा चालक मालक यांचे प्रश्न सोडवा, रिक्षाचालकांना विश्वासात घ्या, रिक्षाचालकांशी चर्चा करा. महाराष्ट्रातील रिक्षा संघटना सोबत चर्चा करा आणि रिक्षाचालकांना अपेक्षित असणारे त्यांना सामाजिक सुरक्षा म्हातारपणी पेन्शन, मुलांना उच्च शिक्षण, रिक्षाचालकांना बिनव्याजी कर्ज मिळवून देणारे कल्याणकारी बोर्ड स्थापन करा अशी मागणी यावेळी केली.


            रिक्षा चालकांच्या या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments