हल्लेखोरास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने केली अटक


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण जवळील विठ्ठलवाडी येथे बहिणीकडे आलेल्या किशोर सावरे यांना दोन व्यक्तींनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी दोन जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.               या गुन्ह्यांचा तपास कल्याण गुन्हे शाखा घटक ३ चे पथक करीत होते. यातील एक आरोपी किरण जाधव (वय ३०) यास कल्याण रेल्वे स्थानकातून गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीस कोळसेवाडी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. किशोर सावरे हे सोमवारी वांगणी वरून विठ्ठलवाडी येथे बहिणीकडे आले होते. रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग परिसरातून जात असताना दोन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉडने त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कल्याण गुन्हे  शाखा घटक ३ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सखोल माहिती काढली असता कोपर स्टेशन जवळ साई सिद्धी झोपडपट्टी मध्ये संशयित किरण रहात असल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेतला असता कल्याण स्टेशन परिसरातून त्याला अटक करण्यात आली.


त्याच्याकडे चौकशी केली असता टिळकनगरकोळशेवाडीडोंबिवलीमानपाडाबाजारपेठ आणि दादर पो.ठाणे येथील दाखल ८ गुन्ह्यांचा उलगडा झाला असल्याची माहिती दिली. आरोपीस कोळसेवाडी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून यातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.


Post a Comment

0 Comments