संविधानाचा अभ्यास करून देशाच्या विकासात योगदान द्यावे – राकेश गायकवाड

■राहनाळ शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न...


कल्याण, प्रतिनिधी  : "आपण जर संविधान शिकलो नाहीतर संविधानच आपल्याला शिकवते. तेव्हा संविधानाचा प्रत्येकाने योग्य पद्धतीने अभ्यास करून स्वतःचागावाचात्याचबरोबर देशाच्या विकासात योगदान द्यावे असे उद्गार राहनाळ गावचे पोलीस पाटील राकेश गायकवाड यांनी नुकताच राहनाळ शाळेतील विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व सांगताना काढले.


२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतंत्र भारताचे संविधान स्वीकारले गेले. आणि २६ जानेवारी १९५० पासून आपल्या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार सुरू झाला. आज २६ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. जिल्हा परिषद शाळा राहनाळ येथे संविधान दिन अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमिला कडू यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर गावचे पोलीस पाटील राकेश गायकवाडशाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या प्रतिभा नाईकशाळेचे मुख्याध्यापक अजय पाटीलसहशिक्षिका अनघा दळवीसंध्या जगतापरसिका पाटील उपस्थित होते.


 गेल्या चार दिवसापासून शाळेतील विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धावक्तृत्व स्पर्धाकविता वाचन स्पर्धाचित्रकला स्पर्धापोस्टर स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी संविधानाची उद्देशिका म्हटली.  संविधानाची घोषवाक्य म्हणून दाखवली. यावेळी अजय पाटील यांनी संविधानाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. संविधानाने दिलेली हक्क आणि कर्तव्य याबाबतची माहिती संध्या जगताप यांनी सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व सांगून संविधानाचा व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार केला.


 विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील तर आभार प्रदर्शन रसिका पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments