परिवहन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
कल्याण, कुणाल म्हात्रे  : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,कामगार कल्याण केंद्र उल्हासनगर यांच्यावतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. परिवहन सेवा गणेशघाट आगार येथे हे आरोग्य शिबीर नुकतेच संपन्न झाले.


या शिबिरामध्ये इसीजी, शुगर, वजन, उंची, बीपी, जनरल चेकअप, आय चेकअप आदी तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरासाठी फोर्टीज हॉस्पिटल, आय क्यू हॉस्पिटल व अपेक्स हॉस्पिटल यांच्या सहकार्याने घेण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण डोबिवली महानगरपालिका परिवहन सेवा वाहतुक निरीक्षक दिपक चौधरी, वाहतुक निरीक्षक रघुनाथ वाझे, बागूल, सुरक्षा आधिकारी भारत सांगळे हे उपस्थित होते.


 या शिबिरा करीता फोर्टीज हॉस्पिटलचे डॉ. श्रेया कुकरेजा व त्यांचे सहकारी व विशाल थुकरूल यांनी तपासणी केली. तसेच आय क्यु हॉस्पिटलच्या डॉ. कांचन गौड व त्याचे सहकारी यांनी नेत्र तपासणी केली. या शिबिरामध्ये एकूण १०८ कामगारांची तपासणी करण्यात आली.


हा कार्यक्रम ठाणे विभागीय कार्यालयाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार कल्याण केंद्र उल्हासनगर येथील केंद्र संचालक दिनकर चौधरी, विना सरेकर, ज्ञानेश भोसले, कीरण पाटील आदींनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments