देव दिवाळी निमित्त उल्हास नदी पुजन, समीक्षा बैठक व नदी प्रदूषण मुक्ती साठी नदीत शिपंले सोडण्याचा उपक्रम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :-  मी कल्याणकर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उल्हासनदी प्रदूषण मुक्त होण्यासाठी नदी मित्र सातत्याने अभिनव उपक्रम आंदोलनच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधुन उल्हासनदीची प्रदुषण मुक्तीकडे वाटचाल होण्यासाठी कार्यरत असुन उल्हासनदीच्या पाण्याला गतवैभव प्राप्त होण्याचा मानस आहे.                      
                                      
     
       उल्हास नदी प्रदूषण मुक्ती साठी सातत्याने झगड़त असलेले नदीमित्रांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोहने गाळेगाव उल्हासनदी तीरी  जमा होऊन देवदिवाळी त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त नदी पुजन केले.    फेब्रुवारी मध्ये केलेल्या उल्हासनदी बचाव आदोलंनाची चर्चा अंती समीक्षा करीत , प्रशासनाने आश्वासन देऊन उल्हासनदी प्रदूषण जसे च्या तसेच आहे. म्हणुन उल्हासनदी नदी प्रदूषणमुक्ति साठी पुढील आंदोलनची दिशा ठरवणे बाबत चर्चा करीत पुढील वाटचालीसाठी  चर्चेअंती दिशा ठरविण्यात आली.


        देव दिवाळी त्रिपुरा पौर्णिमा असे औचित्य साधत उल्हासनदी  प्रदूषणमुक्त करणे साठी उल्हास नदी पात्रात १५०० शिपंले अर्पण केले. जिणे करून नदी पत्रातील पाण्यातील जीवसुष्टीची वाढ होईल पाण्याखालील पार्यावरणाचा समतोल साधण्याबरोबर शिपंल्यामुळे नैसर्गिक रित्या प्रार्दषण मुक्ती साठी मदत  होईल.  या प्रसंगी मी कल्याण कर सामाजिक संस्थेचे नितीन निकम  वालधुनी नदी,उल्हास नदी बचाव समितीचे पदाधिकारी शशिकांत दायमा, नदी मित्र दिपक मोरे इतर नदी मित्र सहकारी उपस्थित होते.           
 
                                       
    
          यानिमित्ताने  मी कल्याण कर सामाजिक संस्थेचे नितिन निकम यांनी प्रतिक्रिया दिली की, उल्हासनदी प्रार्दषणमुक्ती साठी आम्ही कार्यरत असुन  मोहना गाळेगाव नाल्याच्या एच् टी पी चे काम सुरू असुन नाल्यामध्ये प्रशासना तर्फे ३ दगडी गेबियन बंधारे बांधले जात असुन थातुर मातुर उपाययोजना प्रशासन करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सांगितले की, डिसेंबर महिना अखेर शेवटची मुदत प्रशासना तर्फे देण्यात आलेली असुन   उल्हासनदी प्रदूषण मुक्त झाली नाही तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन केले जाईल.

Post a Comment

0 Comments