सनफिस्टने डार्क फॅन्टसी व्हॅनिला फिल्स लाँच करत डार्क शेल व्हॅनिला क्रीम बिस्कीट सादर केले नव्या स्वरुपात

■सनफिस्टने डार्क फॅन्टसी व्हॅनिला फिल्स लाँच करत डार्क शेल व्हॅनिला क्रीम बिस्कीट सादर केले नव्या स्वरुपात..


मुंबई ,१५ नोव्हेंबर २०२१  :  सनफफिस्ट डार्क फॅन्टसी या ITC लिमिटेडच्या भारतातील प्रीमिअम कूकी ब्रॅंडतर्फे डार्क फॅन्टसी व्हॅनिला फिल्स सादर करण्यात आले आहे. व्हॅनिला क्रीम व डार्क शेल बिस्कीट सेगमेंटमध्ये फिल्सचा अनुभव देण्यासाठी व्हॅनिला फिल्स हे अत्यंत उत्कटतेने तयार केले आहे. डार्क चोको शेलच्या आत भरलेल्या रिच क्रीम व्हॅनिला फिलिंगमुळे अत्यंत रुचकर स्वादाचा अनुभव मिळतो.


        नेल्सनच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारतातील क्रीम बिस्कीट कॅटेगरीची बाजारपेठ रु.६,१२३ कोटींची होती. चोको फिल्स कुकीजसह सनफिस्ट डार्क फॅन्टसी हे सेंटर फिल्ड क्रीम बिस्कीट कॅटेगरीचे उद्गाते आहेत. डार्क फॅन्टसी व्हॅनिल फिल्सच्या लाँचसह त्यांनी नव्या, रोचक व्हॅनिल फिल्ड कुकीची ओळख करून दिली आहे आणि डार्क शेल व्हॅनिला क्रीम बिस्कीट सेगमेंटमध्ये नवा अनुभव आणला आहे.


          या लाँचबद्दल ITC लिमिटेडच्या फुड्स डिव्हिजनच्या बिस्कीट्स व केक्स क्लस्टर विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. अलि हॅरिस शेरे म्हणाले, “आपल्या रुचकर चोको खाद्यानुभवासाठी सनफिस्ट डार्क फॅन्टसी प्रसिद्ध आहे आणि सेंटर फिल्ड कुकी कॅटेगरीसाठी ते प्रसिद्ध आहेत. ग्राहकांशी संवाद साधताना आम्हाला समजले की, क्रीम कॅटेगरीमध्ये ग्राहकांना ताजी व नावीन्यपूर्ण प्रोडक्ट्स हवी आहेत. त्याचप्रमाणे सँडविच क्रीम बिस्कीट कॅटेगरीमध्ये कोणताही मोठा बदल किंवा सुधारणा झालेली नाही. 


          आम्ही ही संधी साधत सँडविच क्रीम कॅटेगरी अपग्रेड करत त्यात अधिक चवदार सेंटर फिल्ड अनुभवाची भर घातली. आजच्या युगातील ग्राहकांना नवनवीन अनुभव देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक म्हणजे डार्क फॅन्टसी व्हॅनिला फिल्स आहे. सनफिस्ट डार्क फॅन्टसी हा एका दशकभरापासून ग्राहकांचा आवडता कूकी ब्रँड आहे आणि आमच्या ग्राहकांकडून आम्हाला प्रेम व पाठिंबा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.


          सनफिस्ट डार्क फॅन्टसी व्हॅनिला फिल्सच्या ७५ ग्रॅमच्या पॅकची किंमत रु.२० असून तो दक्षिण व पश्चिम भारतातील सर्व किरकोळ दुकानांमध्ये, निवडक मॅाडर्न ट्रेड दुकानांमध्ये, तसेच www.itcstore.in या वेबसाइटवर उपलब्ध असेल. सनफिस्ट डार्क फॅन्टसी व्हॅनिला फिल्सच्या लाँचला ब्रँडच्या ताज्या अभिनव उत्पादनाला सर्वांसमोर आणण्यासाठी सर्वंकष कम्युनिकेशन कॅम्पेनची साथ लाभणार आहे.

Post a Comment

0 Comments