भिवंडीत एस टी कर्मचाऱ्यांनी घातले शासनाचे तेरावे

 


भिवंडी दि 19 (प्रतिनिधी ) एस टी महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासह आपल्या प्रमुख मागण्यासाठी एस टी कामगारांच्या संपला आज तेरा दिवस पूर्ण झाले असून अजून ही कामगार आपल्या मागण्यांसह आंदोलनावर ठाम आहेत.


           आज राज्यात एस टी कामगार विविध पद्धतीने आंदोलन करीत असताना तुटपुंज्या वेतना मुळे सुरू असलेल्या आंदोलनात आता पर्यंत 38 एस टी कामगारांचा बळी गेला असून त्या नंतर ही शासनास जाग येत नसल्याने भिवंडी एस टी आगारात कामगारांनी सरकारचे तेरावे घालीत आंदोलन केले .या आंदोलनात अनेक चालक वाहक कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments