एसटी कर्मचारी संपाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याणचा पाठिंबा राज्य सरकारमुळे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याणमधील एसटी कर्मचारी संपाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कल्याणने पाठिंबा दिला आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम असून  राज्य सरकारमुळे विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत असल्याची टीका अभाविपने केली आहे.


मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांना घेऊन तीव्र स्वरूपाचा संप पुकारला आहे. या दरम्यान आतापर्यंत ३९ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलले आहे. कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाप्रसंगी त्यांच्या रास्त मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन महाराष्ट्र शासनाने दिले परिणामी एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे देखील घेतला. परंतु आश्वासन हवेतच विरल्याने पुन्हा हे आंदोलन सुरू झाले आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारला आहे.


      संपाला पाठिंबा देताना अभाविपचे शहर मंत्री अमोल शिंदे म्हणाले कीआज अनेक भागातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी एसटी सोडून दुसऱ्या कोणत्याही वाहनाची सोय नाही किंवा काही भागात दुसऱ्या वाहनांची सोय असून ते खर्चिक असल्याने विदयार्थी प्रवास करू शकत नाही. परंतु अशा भागांमध्ये एसटी धावत असल्याने आज त्या भागात घडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे एसटीचे खूप मोलाचे योगदान आहे. पण राज्यसरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने या विद्यार्थ्यांची सुद्धा गैरसोय होत आहे.


      अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कल्याण बस स्थानक येथे आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यात आला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र अभाविप कल्याण शहर मंत्री अमोल शिंदेशहर सह मंत्री समदिशा हरवंदेसमीर शिंदे,स्नेहा शिर्केनिषाद सुपुगडे यांनी सुपूर्द केले.

Post a Comment

0 Comments