वसदगाव परिसरात बिबट्याने वासारांची शिकार केल्याने खळबळ

    


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण ग्रामीण भागातील जांभूळ पाडा नजीक वसदगाव परिसरात बिबट्याने वासारांची शिकार केल्याची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये "बिबट्या आला रे" या भितिने खळबळ उडाली आहे.


कल्याण ग्रामीण परिसरातील वसदगाव परिसरात बुधवारी बिबट्याने वासारावर हल्ला करीत शिकार केल्याची चर्चा असुन काही दिवसांपूर्वी बदलापुर जवळील जांभुळमोहेली,  वसद  भागातील जगंल परिसरात बिबट्याचे ठसे आढळल्याचेही वुत्त होते. तसेच वन विभागाच्या कॅमेरात देखील याठिकाणी बिबट्या कैद झाला होता. बदलापूर ते बारावी धरण परिसर जंगलाचा भाग मोडतो. 


यामुळे कदाचित बिबट्या हा वसद परिसरात आला असवा. सद्यस्थितीत भात पिकाचा काढणीचा मोसम सुरू आहे. जगंलाच्या आजु बाजुच्या परिसर शेतीतील भात कापणी, झोडणी कामे सुरू असुन शेतीचा भाग मोकळा झाल्याने लगतच जगंलाचा भाग असल्याने बिबट्याचा वावर असू शकतो.


बिबट्याने वासाराची शिकार केल्याबाबत कल्याण वन परिक्षेत्र आधिकारी सजंय चन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीबदलापूर ते बारावी परिसर जगंलाचा भाग असून बिबट्या जगंलात असू शकतो. वसद येथील परिसरात ट्रॅप कँमरे लावणार असुन रात्री शिकार झालेल्या ठिकाणी कोणता  हि़ंस्त्र प्राणी कँमेराच्या माध्यमातून दिसतो का हे पाहिले जाणार असुन याकामी वनपालाचे पथक रवाना होणार असल्याचे सांगितले.


 या कँमेराच्या मदतीने  बिबट्या की अन्य हिंस्र प्राणी हे समजण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. तसेच वनरक्षकांच्या मार्फत गस्त घालण्यास सुरु केली असल्यांचे देखील सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments