नवी मुंबईचा पहिलावहिला डिझायनर प्रकल्प होणार साकार


■मेट्रो ग्रुप आणि सत्यम डेव्हलपर्सने जगप्रसिद्ध इंटिरिअर डिझाइन फर्म बिशप डिझायनर्सला केले करारबद्ध ~


मुंबई, २८ नोव्हेंबर २०२१ : महाराष्ट्राचे नव्या युगातील विकासक मेट्रो ग्रुप आणि सत्यम डेव्हलपर्सने नवी मुंबईचा पहिलावहिला डिझायनर विकास प्रकल्प उभारण्याच्या कामी पॉल बिशप यांच्या दुबईस्थित जगप्रसिद्ध इंटिरिअर डिझाइन फर्ममधील सर्जनशील डिझायनर्सची नियुक्ती करण्यासाठी एकत्र आले आहे. नवी मुंबईतील खारघरजवळ उभ्या राहत असलेल्या या प्रकल्पातील राजेशाही बॅक्वे, भव्य प्रवेशदालन आणि प्रकल्पाचा अविभाज्य भाग असलेल्या फ्लोअर लॉबीज डिझाइन करण्याचे काम बिशप डिझाइनद्वारे केले जाणार आहे. बिशप डिझाइनला या प्रकल्पात सहभागी करून घेण्याबरोबरच विकासकांनी धोरणात्मक मार्केटिंग व्यवस्थापन आणि विक्री वितरणाच्या कामासाठी ग्रोथ एक्सलरेटर्स झानडू रिअॅलिटीशी भागीदारी केली आहे, तर लँडस्केप डिझाइनचे काम पीएसएलडीई लँडस्केप आर्किटेक्ट्सना दिले आहे.


      रिअल इस्टेट क्षेत्रातील कुशलतेसाठी नावाजल्या जाणा-या या विकासकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून नवी मुंबईमधील खारघर भाग प्रकाशझोतात आणायचा आहे व त्याला निवासी जागांच्या दृष्टीने आकर्षक ठिकाण अशी नवी ओळख द्यायची आहे. बिशप डिझाइन्सच्या स्टेट-ऑफ-द-आर्ट, समकालीन डिझाइन्समधील सौंदर्यस्थळे दिमाखदार, राजेशाही जीवनशैली अनुभवू पाहणा-यांना प्रभावित करते. अशा डिझाइन्सच्या मदतीने आलिशान जगण्याची नवी व्याख्या घडविणे हा मेट्रो-सत्यम यांचा हेतू आहे.


    एनएच४८ च्या खारघर-डोंबिवली हायवेसारख्या अत्यंत सोयीस्कर ठिकाणी उभा राहत असलेला हा नवा प्रकल्प शहराची गजबज आणि शहराबाहेरील शांत वातावरण यांचा नेमका समतोल साधणारा आहे. बिशप पॉल यांच्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या बिशप डिझाइन या इंटिरिअर डिझाइन फर्मच्या सहयोगाने विकसित केल्या जाणा-या मेट्रो-सत्यमच्या नवीन खारघर अनेक्स प्रकल्पामध्ये अत्याधुनिक, जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी सुसज्ज, नव्या पद्धतीची उंची 1 आणि 2 बेडरूम घरे उपलब्ध असणार आहेत. पंचतारांकित हॉटेलची भव्यता आणि घरगुती वातावरण यांचा मिलाफ यात साधला गेला आहे.

 

     बिशप डिझाइनचे मालक आणि संस्थापक पॉल बिशप म्हणाले, "या आगळ्यावेगळ्या प्रस्तावासाठी मेट्रो-सत्यमशी सहयोग साधण्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे व हा उत्साहवर्धक असा नवा प्रकल्प या भागातील लाइफस्टाइल-डिझाइन जीवनशैलीसाठी नवीन मापदंड आणि अपेक्षा निर्माण करेल, याची आम्हाला खात्री आहे. इमारतींच्या रचनांच्या रूढ सीमारेषा सतत पार करत राहणे आणि त्यातून अंतिमत: जीवन जगण्याबद्दलच्या आपल्या कल्पनेमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये सुधारणा घडवून आमणे हे आमचे लक्ष्य आहे."

Post a Comment

0 Comments