पक्षी सप्ताह निमित्त वन विभागाने केली गावकऱ्यांमध्ये जनजागृती
कल्याण, प्रतिनिधी  : ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताहच्या निमित्ताने भिवंडी तालुक्यातील पडघा वनपरिक्षेत्र मधील किरवली परिमंडळ मध्ये विश्वगड, चाने कुशिवली या गावात जनजागृतीपर सभा घेण्यात आल्या. याच कार्यक्रमात तालुका विधी सेवा समिती कल्याण (कोर्ट कल्याण) यांचे स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्ताने जनजागृती कार्यक्रम अॅड. उज्वला सपकाळे व अॅड. आशा चिमेडिया यांनी घेतला या कार्यक्रमात महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन दोन्ही वकील महिलांनी केले.


पक्षी सप्ताह निमित्ताने विश्वगड गावात झालेल्या एका शाळेत या गावातील सरपंच अनंता जाधव यांनी पक्षी सप्ताह बाबत वनांचे तसेच पशु पक्षाचे महत्व विशद केले. याच ठिकाणी पोलीस पाटील केतन जाधव व पूनम गायकर यांनी आभार प्रदर्शन केले. 


त्यानंतर चाने येथील हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात स्थानिक सरपंच शोभा वळवीपोलीस पाटील मारुती पाटील  यांनी मोलाची मदत केली.  स्थानिक ग्रामस्थ रामचंद्र वळवी यांनी या कार्यक्रमात भाषण केले. तसेच वनरक्षक प्रमोद सुतार यांनी प्रथमच जनजागृती पर भाषण केले. या कार्यक्रमात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.


      कुशिवली गावात झालेल्या कार्यक्रम मध्ये स्थानिक श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते अनंता पाटील यांनी वनांचे महत्त्व सांगताना वनविभाग करीत असलेल्या कामाचे कौतुक केले याच ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ तथा शिक्षक सुरेश जाधव यांनी खूपच सुंदर भाषण करून वनखाते करीत असलेल्या कामाचे कौतुक केले


          नेहमीप्रमाणे वनपाल किरवली साहेबराव खरे यांनी ठिकठिकाणी पक्षी सप्ताह निमित्ताने वने व पर्यावरण चे महत्त्व सांगताना वन्यजीवपक्ष्यांचे महत्त्व विशद केले. याही कार्यक्रमात नागरिक मोठया संख्येने उपस्थित होतेतिन्ही कार्यक्रमात महिला वकील उज्वला सपकाळे व आशा चिमेडिया यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किरवली वनरक्षक प्रमोद सुतार व लहू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments