"भारतीय संविधान आदिवासींच्या दारी" एन. डी. एम. ल जे. संघटनेचा अभिनव उपक्रम

■संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना 'भारतीय संविधानभेट...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा "भारतीय संविधान आदिवासींच्या दारी" हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे राबविण्यात आला. यावेळी एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शक समितीचे मंत्रालईन सदस्य ॲड.डॉ. केवल उके यांच्याहस्ते अनेक होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली.


भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.  या ठिकाणी हेदुटने गावातील आदिवासी वस्तीवर झालेल्या हल्ल्याच्या अत्याचार पिडीत आदिवासी कुटुंबांसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील इतर अत्याचार पिडीतांना एक महिन्याचे रेशन वाटप करण्यात आले.


Post a Comment

0 Comments