आशा सेविकांना बोनस देण्याची महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघाची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघातर्फे आशा सेविकांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली असून याबाबत केडीएमसी पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाश मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली व इंटकचे कल्याण शहर जिल्हा अध्यक्ष कोणार्क देसाई यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कार्यरत आशा सेविकांना सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता निवेदन देण्यात आले. कोरोना सारख्या भयंकर साथरोगात सुद्धा आशा सेविका आपले दैनंदिन काम नित्यनेमाने करत होते परंतु आशा सेविकांना महापालिकेने दिवाळी करिता सानुग्रह अनुदान दिले नाही. त्यामुळे आशा सेविकां मध्ये कमालीची नाराजी आहे.


आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनामध्ये काम करून सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे आशा सेविकांना सानुग्रह अनुदान मिळवून देण्याकरिता संघटना प्रयत्न करत आहे. याकरिता संघटनेकडून पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सचिव विक्रम राठोड, फाईज मुल्ला व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments