नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतील रस्त्याचे भूमि पूजन २५ लक्ष निधीतून शहाड येथील रस्ता पूर्ण होणार


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कार्यकाळातील स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


प्रभाग क्र.१५ शहाड येथील मंगेशी पॅराडाईज बिल्डींग ते मातोश्री वेलबाई देवजी हरिया वरिष्ठ महाविद्यालय शहाड या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व सोसायटीतील नागरिक यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी आमदार नरेंद्र पवार यांचे  आभार मानण्यात आले.


 यावेळी भाजपा मोहोने टिटवाळा मंडळ सरचिटणीस संतोष शिंगोळेअनंता पाटीलप्रभाग क्र.१५ शहाड अध्यक्ष मोहन कोनकरआदि. मान्यवरपदाधिकारी व परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments