पुरस्कार-प्राप्त लघुपट 'टेलिंग पॉण्ड'चा बनणार माहितीपट


मुंबई, १४ नोव्हेंबर २०२१ : समकालीन दिग्दर्शक श्री. सौरव विष्णू दिग्दर्शित पुरस्कार-प्राप्त लघुपट ‘टेलिंग पॉण्ड’ला २०२२-२०२३ मध्ये सहा एपिसोड्सच्या माहितीपटामध्ये बदलण्यात येणार आहे. ऑस्करसाठी पात्र ठरलेला हा लघुपट जादुगोरा, झारखंडमधील आदिवासी कुटुंबांना सामना कराव्या लागलेल्या गंभीर वैद्यकीय स्थितींना दाखवतो. या संकटाचे प्रमुख कारण युरेनियम रेडिएशन आहे.


        "सेक्स अॅण्ड दि सिटी" स्टार सिन्थिया निक्सॉन यांनी कथन केलेला २० मिनिटांचा लघुपट प्रेक्षकांना निरागस आदिवासी लोकांवर युरेनियमच्या घातक परिणामांची सविस्तर माहिती देतो. हा लघुपट बनवण्यासाठी पाच वर्षे अथक मेहनत घ्यावी लागली आणि १६० तासांहून अधिक काळ शूटिंग करावी लागली. आगामी माहितीपट जादुगोराच्या गाथेबाबत अधिक सविस्तर माहिती सांगेल.


      १९५१ मध्ये भारत सरकारला युरेनियममधील भवितव्य समजले आणि १९६७ मध्ये देशातील सर्व युरेनियम खाण क्रियांवर देखरेख करण्यासाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (यूसीआयएल)ची स्थापना करण्यात आली. यूसीआयएलची स्थापना जादुगोरा येथील आदिवासी कुटुंबांच्या जीवनासाठी विनाशकारी ठरले.


      हा हृदयस्पर्शी माहितीपट एक गाव सामना करत असलेल्या क्रूरतेला प्रकाशझोतात आणतो. पण आगामी माहितीपट गाव आणि आसपासच्या भागांमधील इतर टेलिंग पॉण्ड्सना, तसेच आण्विक कचरा डंपिंगच्या बेजाबबदार पद्धतींना दाखवेल. तलावांमधील गाळ स्थानिक माती व भूजलामध्ये  मिश्रित होत आहे, ज्यामुळे स्थानिकांना विषारी विकिरण कच-याचा उच्च धोका आहे.


       टेलिंग पॉण्डचे दिग्दर्शक सौरव विष्णू म्हणाले, "आम्हाला या लघुपटासाठी प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्‍मक प्रतिसाद पाहून आनंद होत आहे. आम्ही आता या कथानकाला सहा एपिसोड्सच्या माहितीपटामध्ये बदलत आहोत, ज्यामधून जादुगोराच्या संपूर्ण गाथेबाबत सखोल माहिती मिळेल. आम्ही रेडिएशन विषबाधेचे बळी पडलेल्या आणि अनेक पिढ्यांपासून यापासून पीडित असलेल्या १२ इतर कुटुंबांना दाखवणार आहोत. 


    या माहितीपटामध्ये संबंधित कार्यकर्ते आणि आपल्या समाजातील इतर महत्त्वपूर्ण सदस्‍यांच्या मुलाखतींचा देखील समावेश आहे. ज्यामध्ये हा मुद्दा अनेक दशकांपासून का दाबून ठेवण्यात आला आहे, याबाबत चर्चा करण्यात येईल. आमच्या नि:पक्षपाती कथेसह आम्ही वरिष्ठ अधिका-यांना आदिवासी लोकांच्या दु:खाची जाणीव करून देऊ."

Post a Comment

0 Comments