बायोकॅचचे 'म्यूल अकाऊंट डिटेक्शन' सोल्यूशन लॉन्च

■आर्थिक संस्थांना मनी लॉण्डरिंग समस्येचा सामना करण्यासाठी करणार मदत ~


मुंबई, १७ नोव्हेंबर २०२१ : बायोकॅच ( BioCatch ) या बीहेवीरल बायामेट्रिक्समधील जागतिक अग्रणी कंपनीने आज दर्जात्मक सोल्यूशन म्यूल अकाऊंट डिटेक्शनच्या लॉन्चची घोषणा केली. हे सोल्यूशन मनी म्यूल स्थितींविरोधात व्यापक संरक्षण देते. मनी म्यूल्स या व्यक्ती दुस-या व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार काम करतात, फसवणूकीमधून प्राप्त झालेल्या पैशांची देवाण-घेवाण करतात. म्यूल अकाऊंट्स फसवणूकीमधून प्राप्त झालेली रक्कम आणि मनी लॉण्डरिंग प्रक्रिया यांच्याशी संबंधित फ्रॉड सप्लाय चेन इन्फ्रास्ट्रक्चरमधील महत्त्वपूर्ण दुवा आहेत.


      "अनेक विविध प्रकारच्या स्थितींमुळे म्यूल अकाऊंट डिटेक्शनची समस्या जटिल आहे. गुन्हेगार फसव्या किंवा कृत्रिम ओळखीसह म्यूलिंग प्रक्रियेसाठी नवीन खाते उघडत आर्थिक संस्थेसोबत व्यवहार करत असतील किंवा नकळतपणे बळी पडलेल्या व्यक्तीच्या खात्याचा आधार घेत फसवणूकीचा गैरप्रकार करत असतील, अशा स्थितीत बायोकॅच म्यूल अकाऊंट डिटेक्शन मशिन लर्निंग रिस्क मॉडेल्सचा वापर करत खाते उघडण्याच्या, तसेच पेमेण्टच्या टप्प्यावर म्यूल कृतीचे संकेत देणा-या विविध फसवणूक स्थितींना ओळखते असे बायोकॅचचे मुख्य कार्यकारी अधिकारी गॅडी मेझर म्हणाले.


     बायोकॅचचे फ्रॉड प्रोटेक्शन प्लॅटफॉर्म खाते उघडण्यासंदर्भात फसवणूक, खात्यावर ताबा, घोटाळे व आता म्यूल अकाऊंट्स अशा विविध केसेससंदर्भात आर्थिक फसवणूक ओळखते. नाविन्यपूर्ण बीहेवीरल बायोमेट्रिक तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आलेले बायोकॅच ५० हून अधिक जागतिक आर्थिक संस्थांचा लाभ घेत फसवणूकीचा भावनिक व आर्थिक परिणाम कमी करते आणि फसवणूक ओळखत ग्राहकांना विश्वास व सुरक्षिततेची खात्री देते. तसेच ग्राहक व त्यांच्या मालमत्तांचे आजच्या काळातील अत्याधुनिक फसवणूक धोक्यांपासून संरक्षण करते.

Post a Comment

0 Comments