डोंबिवली रेल्वे सुरक्षा बल महिला कर्मचारीमुळे रेल्वे प्रवासी महिलेची प्रसूती सुखकर
डोंबिबली ( शंकर जाधव )  प्रवासा दरम्यान एका महिला प्रवाशाला प्रसूती वेदना होऊ लागल्यावर प्रवासी महिलेला रेल्वे सुरक्षा बल महिला कर्मचारी यांनी तातडीने मदत करून रिक्षाने पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलात नेले,. तेथील डॉक्टर डॉ. काजल शहा यांनी त्यांना आवश्यक सेवा दिली. दरम्यान या महिला प्रवाशाने नवजात बाळाला (मुलगा) जन्म दिला. 


         रेल्वे सुरक्षा बल महिला प्रवाशाने मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. याबाबत रेल्वे प्रशासना कडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी 8 नोव्हेंबर रोजी, महिला हवालदार भावना आणि दुर्गेश हे शिफ्टमध्ये ड्युटीवर होते. ड्युटी दरम्यान सकाळी 6.20 च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मध्यभागी फलाट नंबर ३ वर होते. 


         डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाने त्या महिला कॉन्स्टेबलला सांगितले की, महिला प्रवाशी या डब्यातून प्रवास करत असून तिला प्रसूती वेदना होत आहेत.  महिला कॉन्स्टेबल - दुर्गेश आणि भावना यांनी महिला प्रवाशाला डोंबिवली स्थानकात खाली उतरवले आणि याबाबतची माहिती व्यवस्थापन डोंबिवली यांना माहिती दिली.

 
         त्यानंतर सदर महिला प्रवाशाला तात्काळ ऑटो रिक्षाने पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली (प.) येथे नेण्यात आले, तेथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर डॉ. काजल शहा यांनी त्यांना त्या महिलेला आवश्यक सेवा दिली.  या महिला प्रवाशाने नवजात बाळाला (मुलगा) जन्म दिला.  महिला आणि तिचे बाळ दोघेही निरोगी आहेत. 


       त्या महिलेची चौकशी केल्यानंतर  तिचे नाव  सना इफ्तियार अन्सारी ( वय२९ ) असे असून ती  खडवलीत राहते. याबाबत तिने सांगितले की, ती केईएम-हॉस्पिटल,(मुंबई) येथे प्रसूतीसाठी दाखल होत होती. मात्र डोंबिवली स्थानकात येण्यापूर्वीच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले.

Post a Comment

0 Comments