२६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवानांना सिद्धेश्वर तलावा शेजारील शहीद उद्यानात श्रद्धांजली


ठाणे, प्रतिनिधी : -  देशासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना नेहमी स्मरणात राहावे यासाठी खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सिद्धेश्वर तलाव शेजारी असलेल्या शहीद उद्यानात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात आली. 


          या वेळी ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, पोलीस उपयुक्त वाहतूक शाखा बाळासाहेब पाटील, सहायक पोलीस आयुक्त नौपाडा ढोले, नौपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक धुमाळ, ठाणे नगर नरवरे, नगरसेवक सुधीर कोकाटे, शहरप्रमुख ठाणे विधानसभा हेमंत पवार, स्थानिक नगरसेविका नंदिनी राजन विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, संजय सोनार, परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक, विभाग प्रमुख राम काळे, उप विभागप्रमुख राजु मोरे, शाखाप्रमुख धोंडू मोरे, मिलिंद मोरे, दीपक म्हस्के, युवा सेना अधिकारी नितीन लांडगे, उप युवा अधिकारी योगेश सावंत, शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments