आभा परिवर्तनवादी संस्थेचा जल्लोष्मय आठवा वर्धापनदिन संपन्न
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आभा नावाचं २७ ऑक्टोबर २०१३ रोजी सामाजिक बंधिलकीच लावलेलं छोटंसं रोपटं त्याला २७ ऑक्टोबर २०२१ रोजी आठ वर्षे पूर्ण होऊन त्याचं हळू हळू रोपट्यातून वृक्षामध्ये रूपांतर होत आहे. आभा परिवर्तनवादी संस्थेचा आठवा वर्धापनदिन गूगल मीटवर ऑनलाइन पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांच्या समवेत साजरा करण्यात आला.


आभा परिवर्तनवादी संस्थेचा आठवा वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी मैसूर ओडिटोरिम हॉलमाटुंगा येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम उपस्थिती होत्या. कार्यक्रमाची सुरुवात रोचना विद्या आणि प्रज्ञा गानला यांनी "मौनबोली" स्त्री जीवनाचा वेध घेणाऱ्या कवितांचे सादरीकरण करत केली. मनाला भावनाऱ्या आणि वास्तविकतेला धरून अशा कवितांचे भन्नाट सादरीकरण केले.


 त्यानंतर राईट टू लव्हचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत के आणि मुक्ताई प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्षप्रसिद्ध कवी सागर काकडे यांच्यासोबत सामाजिक काम करीत असताना त्यांना आलेल्या समस्यायश-अपयशआताच्या युवक कार्यकर्त्याने समाजात काम करत असताना आपले योगदान कसे द्यावे आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहत काम केले पाहिजे असे अनेक प्रश्न आभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश मोरे यांनी विचारत अगदी खेळीमेळीने चर्चा सत्र पार पाडले.


 तसेच अभिनेता किरण तांबे यांनी स्टँड अप कॉमेडीचे सामाजिक विषयाला धरून आणि वास्तविकता मांडत श्रोत्यांना हसवत - खेळवत सादरीकरण केले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अभिनेत्री छाया कदम यांना राजेश मोरे यांनी त्यांच्या जीवनाबाबत आणि एकंदरीत इंडस्ट्रीबाबत असे अनेक प्रश्न विचारत चर्चा पार पाडली. यातून कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांनाच प्रेरणा आणि एक लढण्याची उमेद मिळाली असेलच. या कार्यक्रमात अनेक संस्थेचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते.


आभा परिवर्तनवादी संस्था दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थेबाहेरील सामाजिक कार्यकर्त्यांना "युवा एल्गार" आणि "युवा प्रेरणा" असे दोन पुरस्काराने गौरवून त्यांना प्रोत्साहान आणि नवीन काम करण्याची ऊर्जा देण्याचं काम करते. यावर्षी राईट टू लव्ह" संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ८५ आंतरजातीय आणि १५ आंतरधर्मीय लग्न लावले असून प्रेम या क्षेत्रात उत्तम आणि वाखाणण्याजोगे काम करणारे युवा व्यक्तिमत्व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित के यांना "युवा एल्गार" पुरस्कार आणि पत्रकारिता करत आपला पत्रकारितेमध्ये ठसा उमटवणाऱ्या पत्रकार शर्मिला कलगुटकर यांना "युवा प्रेरणा" पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. 

Post a Comment

0 Comments