कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना अध्यक्षपदी देवचंद अंबादे यांची निवड

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील ड प्रभागकक्षेत्र कार्यालय आवारात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकासाठी लागणाऱ्या विविध परवानग्या कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी मिळविल्या तसेच या  जागेच्या आरक्षणाचा प्रश्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निकाली काढल्या नंतर या स्मारकासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. 


      विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, कल्याण पूर्व असे या समितीला नाव देण्यात आले असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अण्णा रोकडे, देवचंद अंबादे, मिलिंद बेळमकर, भारत सोनवणे, सुमेध हुमणे आणि शेखर केदारे आदीजण उपस्थित होते.


         डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कसे व्हावे, कशाप्रकारे नियोजन असावे यासाठी ही समिती भारतातील विविध ठिकाणी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचा, बुद्ध विहारांचा, विपश्यना केंद्र आदींचा अभ्यास करून त्याचा उपयोग कल्याण पूर्वेतील स्मारकाच्या उभारणीसाठी करण्यात येणार असल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष देवचंद अंबादे यांनी दिली. 


         दरम्यान या समितीमध्ये संस्थापक अध्यक्ष अण्णा रोकडे, अध्यक्ष देवचंद अंबादे, कार्याध्यक्ष महेश गायकवाड, उपाध्यक्ष आर. जी. नितनवरे, सह उपाध्यक्ष मिलिंद बेळमकर, सचिव सुमेध हुमणे, सहसचिव हर्षवर्धन पालांडे, कोषाध्यक्ष भारत सोनावणे, सहखजिनदार शेखर केदारे यांचा समावेश आहे. तर ५ प्रमुख सल्लागार असून १४ सदस्यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments