कल्याण मध्ये प्रथमच बी व्होक डिग्री अभ्यासक्रम


कल्याण , प्रतिनिधी : कल्याण पश्चिम अचिएव्हर्स महाविद्यालयाला नुकतीच मुंबई विद्यापीठ तसेच यूजीसिनवी दिल्ली तसेच महाराष्ट्र शासनाकडून बी व्होक इन मॅनेजमेन्ट अँड आंत्रप्रेयुरशिप तसेच टुरिसम मॅनेजमेन्ट असे दोन डिग्री अभ्यासक्रम तसेच एम व्होक हा पदवीउत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. महेश भिवंडीकर हे सिए असून १२ वी नंतर विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे धडे गिरवून उद्योजक बनावे असे त्यांचे मात आहे.


सध्याचे बीकॉम/बीम्एस अभ्यासक्रम हे विद्यार्थी घडवण्यास असमर्थ ठरत आहेत  आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच तरुणांना व्यासायिक  बनविण्याचा ध्यास घेऊन महाविद्यालयाने जिगरीने हे अभ्यासक्रम राबविण्याचे ठरवले आहे.  असे व्यासायिक अभ्यासक्रम राबविणारे ठाणे ज़िल्यातील हे पहिलेच महाविद्यालय आहे.  महाविद्यालयाची सुसज्य इमारत कल्याण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्टेशन पासून जवळच असून अभ्यासक्रमासाठी सर्व भौतिक सुविधाग्रंथालय तसेच उपक्रमशील शिक्षकवृंद उपलब्ध आहेत.


या अभ्यासक्रमात उद्योगाची बीजे रुजवण्यापासून त्याच्या उभारणीसाठी उपयुक्त अभ्यासक्रम तसेच उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास असे विविध विषय शिकवून अंतिम वर्षात विद्यार्थी स्वतःची कंपनी सुरु करूनच विद्यार्थी बाहेर पडतील असे मत प्राचार्यानी मांडले. विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून सादर अभ्यासक्रमा साठी सतत विचारणा होत आहे.

Post a Comment

0 Comments